‘मिमी’ चित्रपटातून चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे क्रिती सेनॉन. अभिनयाच्या बरोबरीने तिच्या लुक्सची देखील चर्चा होता असते. अभिनेता टायगर श्रॉफच्या बरोबरीने तिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवले आहे. क्रितीने यंदाच्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी (IIFA) पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे. क्रितीने काही दाक्षिणात्य चित्रपटात देखील काम केले आहे. ‘दिलवाले’, ‘राबता’, ‘मिमी’, ‘हाऊसफुल्ल ४’ सारख्या वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.

मिमीमधील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे मात्र क्रिती सध्या एका कार्यशाळेत व्यस्त आहे.दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली, क्रितीने तिच्या पुढील कार्यासाठी अभिनय कार्यशाळा आणि संवाद आणि भाषा प्रशिक्षण सुरू केले आहे. सूत्रांच्या मते, अनुराग कश्यपने आजवरच्या बॉलीवूडच्या इतिहासातील सर्वात वाईट अशा महिलेचे पात्र लिहले आहे. सूत्रांनी पुढे सांगितले की, हा एक अत्यंत भावनिक चित्रपट आहे. पडद्यावर यापूर्वी कधीही न पहिल्यासारखी अत्यंत क्रूर, बदला घेणारी अशी व्यक्तीरेखा क्रिती साकारणार आहे.

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यान अभिनेते सचिन पिळगावकर भडकले, म्हणाले “मला ऑर्डर करू… “

अभिनेता निखिल द्विवेदी ज्याने ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात काम केले आहे. तो या चित्रपटाची निर्मिती करत आहे. निर्मिती क्षेत्रात तो आपले पदार्पण करत आहे. हा चित्रपट ‘किल बिल’ या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक असल्याची अफवा पसरली होती पण दिग्दर्शक अनुराग कश्यपने यावर नकार दिला आहे. चित्रपटाचे चित्रीकरण नोव्हेंबर २०२२ मध्ये सुरू होणार आहे.

‘बच्चन पांडे’ हा तिचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट. या चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत दिसली होती. क्रिती मूळची दिल्लीची असून पेशाने ती इंजिनियर आहे मात्र तिने करिअरची सुरवात मॉडेलिंग क्षेत्रापासून केली आहे. चित्रपटात काम करण्याआधी तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे. क्रिती सेनॉन लवकरच ‘गणपत’, ‘आदीपुरुष’ आणि ‘भेडीया’ या चित्रपटात झळकणार आहे.

Story img Loader