बॉलिवूडमध्ये येण्यासाठी कलाकारांना खूप संघर्ष करावा लागतो. विशेषत: चित्रपटसृष्टी बाहेरून येणार्या लोकांना मुंबईत राहण्याची जागा मिळणे फारच अवघड असते. चित्रपटांपासून दूर असलेली अभिनेत्री मिनिषा लांबादेखील बॉलिवूडमध्ये पाय ठेवायला दिल्लीतून मुंबईत आली होती. मिनिषाला तिच्या सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आणि मुंबईतील तिच्या संघर्षाची कहाणी तिने शेअर केली आहे.
मिनीषाने नुकतीच रेडिओ होस्ट सिद्धार्थ कन्नन याला मुलाखत दिली होती. यावेळी तिने मुंबईतल्या तिच्या संघर्षाबद्दल सांगितले आहे. “जेव्हा मी मुंबईत आले होते तेव्हा माझ्याकडे खूप कमी पैसे होते. मी एका पीजीमध्ये राहत होते, ज्याचे भाडे ५ हजार रुपये होते. त्यावेळी माझ्या घरमालकीनीने माझ्यावर चोरीचा आरोप केला होता. त्यांनी सांगितले होते की मी त्यांच्या कपाटातून पैसे चोरले आणि मला घर सोडायला सांगितले. मी चोरी केली नव्हती हे देखील मी त्यांना सांगितले होते. त्यानंतर मला दोन दिवसात पीजी सोडावा लागला कारण तिथे माझ्या आदराचा प्रश्न होता,” असं मनिषा म्हणाली.
तिच्या स्ट्रगलबद्दल बोलताना मिनिषा म्हणाली, “माझ्याकडे पैसे नव्हते आणि मला जास्त महागडे घर परवडत नव्हते. त्यानंतर मी ७ हजार रुपयात एक फ्लॅट भाड्याने घेतला जो एका मोठ्या खोलीसारखा होता. संपूर्ण फ्लॅट एका मोठ्या खोलीत होता. म्हणजे तो फ्लॅटच्या नावावर अगदी लहान होता परंतु त्यावेळी या व्यतिरिक्त मला दुसरं काही परवडत नव्हते.”
View this post on Instagram
आणखी वाचा : टायगर आणि दिशाच्या रिलेशनशीपवर जॅकी श्रॉफ यांचे वक्तव्य, म्हणाले…
दरम्यान, मॉडेलिंगनंतर मिनिषा लांबाने शुजित सरकर यांच्या ‘जहां’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाचे आणि मिनिषाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. यानंतर मिनिषाने ‘हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड’, ‘बच्चना ए हसीनो’, ‘वेल्डन अब्बा’ आणि ‘भेजा फ्राय २’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. टीव्ही रियलिटी शो ‘बिग बॉस’शिवाय मिनिषाने ‘छुना है आसमान’, ‘तेनाली रामा’ आणि ‘इंटरनेट वाला लव’ यासारख्या मालिकांमध्येही काम केले आहे.