तामिळ अभिनेता विशालने गुरुवारी (२८ सप्टेंबर रोजी) एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये त्याने चित्रपटसृष्टीतील भ्रष्टाचाराबद्दल सांगितलं आहे. ‘मार्क अँटनी’ नावाचा चित्रपट हिंदीत प्रदर्शित करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्याला ६.५ लाख रुपये दिल्याचा दावा त्याने व्हिडीओमध्ये केला. त्याच्या या दाव्यानंतर खळबळ उडाली आहे. त्याच्या व्हिडीओची दखल केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयानेही घेतली आहे.

सेन्सॉर सर्टिफिकेट्ससाठी ६.५ लाख द्यावे लागले, तामिळ अभिनेत्याचा आरोप; शिंदे, मोदींना आवाहन

Ajit Pawar meet Sharad Pawar
Ajit Pawar meet Sharad Pawar : अजित पवार-शरद पवार एकत्र येणार का? शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ते पवार आहेत, कधीही…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!

“अभिनेता विशालने CBFC मधील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे आणला आहे. घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. सरकार भ्रष्टाचार अजिबात सहन करणार नाही. यामध्ये कोणीही सहभागी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची आजच मुंबईत नियुक्ती करण्यात आली आहे. CBFC कडून छळवणुकीच्या इतर घटनांबद्दल माहिती देऊन मंत्रालयाला सहकार्य करा,” असं आवाहन मंत्रालयाने केलं आहे.

विशालने केलेली तक्रार नेमकी काय?

“आम्ही मार्क अँटनी चित्रपट प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज केला होता पण आम्हाला प्रमाणपत्रासाठी रुपये ६.५ लाख भरण्यास सांगण्यात आलं. आम्हाला आधी चित्रपट पाहण्यासाठी ३ लाख रुपये पाठवायचे होते आणि नंतर प्रमाणपत्रासाठी उर्वरित ३.५ लाख रुपये द्यायचे होते. माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता, त्यामुळे मला पैसे द्यावे लागले. मला प्रमाणपत्र मिळाले आणि चित्रपट उत्तर भारतात प्रदर्शित झाला. मी उच्च अधिकार्‍यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करतो,” असं विशाल म्हणाला होता.

Story img Loader