तरुणींच्या ह्रदयाचा ठोका चुकवणारा शाहीद कपूर विवाह बंधनात अडकण्याच्या उंबरठ्यावर असतानाच त्याची आई आणि अभिनेत्री निलीमा अझीम यांनी आपली सून मीरा राजपूत अतिशय प्रेमळ आणि लाघवी स्वभावाची असल्याचे सांगून तिचे कौतुक केले. ‘मिड-डे’च्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
माझी आणि मीराची भेट मुंबई तसेच दिल्लीतही झाली आहे. तिचा स्वभाव अतिशय प्रेमळ आणि लाघवी आहे. तसेच तिचे कुटूंबही आनंददायी आहे, असे त्यांनी सांगितले. शाहीदचे वडील पंकज कपूर यांनी हे लग्न जुळवल्याचे वृत्त मध्यंतरी प्रसारित झाले होते. या वृत्ताचे खंडन करुन मीराशी लग्न करण्याचा निर्णय हा शाहीदने स्वखुषीने घेतला आहे. आपण काय करत आहोत, याची शाहीदला पूर्णपणे जाणीव असून, त्याच्या या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो, असे त्यांनी सांगितले. सध्या शाहीद कामामुळे प्रचंड व्यस्त असला, तरी लवकरच तो विवाह बंधनात अडकणार असल्याने आपण अतिशय उत्साहात असून, त्यांचे वैवाहिक जीवन आनंदात जावो, यासाठी आपण शुभेच्छा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
शाहीद अलीकडेच रोका समारंभासाठी दिल्लीमध्ये होता. यावेळी शाहीदने मीराला २३ लाख रुपये किमतीची अंगठी भेट दिल्याची माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. येत्या १० जून रोजी ग्रीस येथे शाहीद आणि दिल्लीस्थित मीरा राजपूत यांचा लग्नसोहळा रंगणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा