बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. शाहीद आणि मीराच्या जोडीला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळताना दिसतं. अभिनय आणि कामासोबतच शाहिद कायमच कुटुंबाला प्राधान्य देणं पसंत करतो. शाहीद आणि मीराचे लग्न २०१५ मध्ये झाले होते. लग्नाच्या वेळी मीरा फक्त २१ वर्षांची होती. मीरा ही कॉलेजमध्ये असताना तिच्या एका मैत्रिणीला शाहिद कपूरवर क्रश होते. काही दिवसांपूर्वी मीराने स्वत: एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला होता.
काही दिवसांपूर्वी मीराने दिलेल्या एका मुलाखतीत तिला शाहिद कपूरबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. शाहिद कपूरला पडद्यावर बघताना कधी त्याच्याबद्दल क्रश निर्माण झाला होता का? असा प्रश्न मीराला विचारण्यात आला. त्यावेळी मीरा म्हणाली की, “माझ्या खास मैत्रिणीचा शाहिदवर क्रश होता. मी जेव्हा माझे लग्न शाहिदसोबत होणार असल्याचे सांगितले तेव्हा तिला याबद्दल अजिबात धक्का बसला नाही,” असे ती म्हणाली.
“कारण लग्नापूर्वी तिने अनेकदा तिला शाहिदवर प्रेम असल्याचे सांगितले होते. पण त्यावेळी मला या गोष्टींचा काहीही फरक पडला नाही. विशेष म्हणजे ही गोष्ट आम्हाला आज देखील हे सर्व आठवलं तरी आम्ही हसतो. कारण तिला शाहिद प्रचंड आवडायचा,” असे तिने सांगितले.
दरम्यान, शाहिद कपूरचा कबीर सिंह हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यात शाहिदसोबत कियारा अडवाणी झळकली होती. लवकरच शाहिद राज निदिमोरू आणि कृष्णा डीके यांच्या आगामी वेब सीरिजद्वारे डिजीटल पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. तसंच शाहिद ‘जर्सी’ या सिनेमातूनही झळकणार आहे. यात तो एका क्रिकेटपटूची भूमिका साकारणार आहे.