सध्या शाहिदची बायको मीरा राजपूत ही चर्चेचा विषय झाली आहे. दिल्लीस्थित मीरा राजपूतने शाहिदशी लग्न केल्यापासून माध्यामांपासून स्वतःला लांबच ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पण, शाहिदच्या निकटवर्तीयांना तिच्याबद्दल वारंवार काहीना काही प्रश्न विचारला जातोचं. अशाचं काहीशा प्रश्नांना ‘शानदार’ चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहलचीदेखील यामध्ये वर्णी लागली आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेता विकासला मीरा एक व्यक्ती म्हणून कशी वाटते, असे विचारले असता तो म्हणाला, ती माझ्या मित्राची बायको आहे. मी का तिच्यावर काही प्रतिक्रिया देऊ? मीरा ही सध्या भारतीय कर्णधार धोनी झाली आहे. प्रत्येकजण सध्या या दोघांबद्दलचं बोलत आहे. नुकताचं विकासने मीराला ‘शानदार’ चित्रपट दाखवल्याचे सांगितले होते. त्याबद्दल स्पष्टीकरण देताना तो म्हणाला की, मी मीराला चित्रपटातील केवळ काहीचं दृश्य दाखविली आहेत. ते पाहून तिला खूप आनंददेखील झाला.
शाहिद आणि आलिया भटची जोडी पहिल्यांदाचं ‘शानदार’ चित्रपटाद्वारे एकत्र दिसणार आहे. हा चित्रपट २२ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोयं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा