बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर आणि आणि त्याची पत्नी मीरा राजपूत कपूर यांच्या आयुष्यात गेल्या वर्षी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं. या चिमुकल्या पाहुण्याच्या आगमनामुळे आता या कुटुंबाची चौकट पूर्ण झाली आहे. मीरा-शाहीदला मीरा आणि झैन अशी दोन मुलं आहे. झैनच्या जन्मापूर्वी संपूर्ण कपूर कुटुंब स्वागतासाठी सज्ज होतं. मात्र या नव्या बदलालासामोरं जाण्यासाठी आम्ही मीशाची खास पद्धतीने समजूत घातल्याचं मीराने नुकतंच सांगितलं.

काही दिवसापूर्वी मीराने तिच्या इन्स्टाग्रामवर Ask Me A Question या टॅगखाली तिच्या आयुष्याविषयी, करिअरविषयी अनेक गोष्टींवर भाष्य केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी तिने झैनचं लवकरच घरात आगमन होणार असून त्याच्या येण्यामुळे आयुष्यात होणाऱ्या बदलासाठी मिशाला कसं तयार केलं हे सांगितलं.

‘आमच्या आयुष्यात नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहुल लागल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे मीशाला याविषयी कसं सांगायचं ? कारण प्रत्येक लहान मुलाला त्याचे आई-वडील हे फक्त त्याचे असावे असंच वाटतं. आपल्या आईवडीलांच्या आयुष्यात नवीन कोणीतरी येणार या गोष्टीमुळे अनेक वेळा मुलं बिथरुन जातात. त्यामुळे आम्ही सुरुवातीपासूनची मीशाची मानसिक तयारी करण्यास सुरुवात केली होती. आमच्यासोबतच तिच्या आयुष्यातही नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे याची जाणीव आम्ही तिला करुन दिली’, असं मीरा म्हणाली.

पुढे ती असंही म्हणाली, ‘झैन हा तिचा लहान भाऊ असून त्याची काळजी कशी घ्यायची, तो रडत असताना त्याला शांत करायचं हे आम्ही तिला सांगितलं. हे सांगत असताना आम्ही अनेक वेळा गोष्टींचा किंवा पुस्तकांचा आधार घेतला. विशेष म्हणजे हे सांगत असताना ती आमच्यासाठी तेवढीच महत्वाची आणि खास आहे हेदेखील वेळोवेळी सांगत राहिलो’.

‘मीशाची समजूत काढल्यानंतर मीशा झैनच्या आगमनासाठी पूर्णपणे तयार झाली आणि आता झैन कधी रडत असेल तर ती अंगाई गाऊन अनेक वेळा त्याला शांत करते’, असंही मीराने सांगितलं.

गेल्या वर्षी झैनचा जन्म झाला असून त्याच्या नावाविषयी अनेकांना उत्सुकता होती. मीशाचं नाव मीराचा ‘मी’ आणि शाहीदचा ‘शा’ यावरुन ‘मीशा’ असं ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे मीरा-शाहीदच्या नव्या बाळाचं नावही असंच काहीसं हटके असणार असं साऱ्यांना वाटलं होतं. त्यानुसार या नव्या बाळाचं नावही हटकेच ठरलं. मीरा -शाहीच्या बाळाचं झैन असं नाव ठेवण्यात आलं.

 

Story img Loader