Femina Miss India 2024 Winner Nikita Porwal : यंदा ‘मिस इंडिया’ होण्याचा बहुमान मध्य प्रदेशच्या निकिता पोरवालने पटकावला आहे. तर, केंद्रशासित प्रदेशांचं प्रतिनिधित्व करणारी रेखा पांडे उपविजेती ठरली आहे. ‘मिस इंडिया’चा खिताब पटकावणारी निकिता पोरवाल आहे तरी कोण? यशाचा हा टप्पा तिने कसा गाठला जाणून घेऊयात…

निकिता पोरवालने वयाच्या १८ व्या वर्षी तिच्या करिअरची सुरुवात टीव्ही अँकर म्हणून केली. त्यानंतर ती अभिनय क्षेत्राकडे वळली. आतापर्यंत ६० हून अधिक नाटकांमध्ये तिने काम केलंय. एवढंच नव्हे तर ‘कृष्ण लीला’ हे २५० पानी नाटकसुद्धा तिने लिहिलं आहे. याशिवाय निकिताच्या एका चित्रपटाचं आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये स्क्रीनिंग पार पडलं असून आता लवकरच हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार आहे. निकिताने आपलं सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर ही प्रतिष्ठित स्पर्धा जिंकली याचा तिच्या कुटुंबाला प्रचंड अभिमान वाटत आहे.

Will AAP win Delhi Assembly elections 2025 for fourth time or BJP will get chance after 31 years
‘आप’ चौथ्यांदा, की… भाजपला ३१ वर्षांनी संधी?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharashtra Kesari Wrestling Tournament Winner Prithviraj Mohol Reaction on shivraj rakshe
होय शिवराज राक्षेची एका बाजूची पाठ नक्कीच टेकली होती : पृथ्वीराज मोहोळ
BCCI Announces 5 Crore Cash Prize For India U19 Womens Team for Winning T20 World Cup
U19 World Cup 2025: भारताच्या U19 मुलींचा विश्वविजेता संघ झाला मालामाल, BCCIने जाहीर केलं कोट्यवधींचं बक्षीस
U19 T20 WC 2025 Gongadi Trisha break Shweta Sehrawat most runs record in tournament
U19 T20 WC 2025 : गोंगाडी त्रिशाने घडवला इतिहास! महिला अंडर-१९ टी-२० विश्वचषकात केला मोठा पराक्रम
Virat Kohli returns to Ranji Trophy cricket sport news
कोहलीला सूर गवसणार? रणजी करंडकात आज १२ वर्षांनी
Cricketer from Dombivli Shreyas Gurav has been selected in mumbai Ranji team
डोंबिवलीच्या श्रेयस गुरव यांची मुंबई रणजी संघात निवड
India's Gongadi Trisha Historic Century first ever century in the History of U19 Women's T20 World Cup
U19 Women’s T20 World Cup: भारताच्या १९ वर्षीय त्रिशाचा वर्ल्ड रेकॉर्ड, महिलांच्या टी-२० विश्वचषकात ‘ही’ कामगिरी करणारी जगातील पहिली फलंदाज

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’साठी आधी दिलेला नकार, मग घडलं असं काही…; प्राजक्ता माळीने स्वत: केला खुलासा, कसा बदलला निर्णय?

मुंबईत यंदाच्या ‘मिस इंडिया वर्ल्ड’ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. २०२३ ची मिस इंडिया नंदिनी गुप्ताने निकिताच्या डोक्यावर क्राऊन घातला. यावेळची क्षणचित्रं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुंबईत पार पडलेल्या या सोहळ्यात संगीता बिजलानीने रॅम्प वॉक केला.

मध्य प्रदेशच्या उज्जैन येथे राहणारी निकिती पोरवाल पेट्रो-केमिकल व्यावसायिक अशोक पोरवाल यांची मुलगी आहे. तिने बॅचलर ऑफ परफॉर्मिंगमध्ये पदवी संपादित केली आहे. कॉलेजमध्ये असताना तिला नाटकाची प्रचंड आवड होती. निकिताला आधीपासून वाचन, लेखन, चित्रकला आणि चित्रपट पाहण्याचा छंद आहे.

हेही वाचा : ठरलं तर मग : अर्जुनच्या हाती लागला सर्वात मोठा पुरावा! चैतन्यने दिली साक्षीबद्दलची हिंट, आता कोर्टात काय घडणार? पाहा प्रोमो

हेही वाचा : ऑनस्क्रीन अन् ऑफस्क्रीन सासूबाई! फोटो शेअर करत शिवानी रांगोळे म्हणते, “या दोघी माझ्या…”

निकिताबद्दल आश्चर्याची वाटणारी गोष्ट अशी की, ती सोशल मीडियावर फारशी सक्रिय नाही. मिस इंडिया जिंकण्याआधी इन्स्टाग्रामवर तिचे फक्त ५ हजार फॉलोअर्स होते. पण, एवढ्या लहान वयात प्रचंड मेहनत घेऊन तिने हा यशाचा टप्पा गाठला आहे. सामान्य मुलगी, अभिनय क्षेत्रात करिअरला सुरुवात ते मिस इंडिया…निकिताचा हा प्रवास हजारो मुलींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Story img Loader