मनोरंजन विश्वात आंतरराष्ट्रीय स्तरावर आजपर्यंत मोजक्याच भारतीय अभिनेत्रींना यश मिळवता आले आहे. यापैकी एक नाव म्हणजे माजी मिस इंडिया आणि मॉडेल परसिस खंबाटा. तिच्याएवढी लोकप्रियता क्वचितच कोणत्या भारतीय अभिनेत्रीला मिळाली असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परसिस खंबाटाचा जन्म २ ऑक्टोबर १९४८ मध्ये मुंबईत झाला. परसिसने १९६५ मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकला. यानंतर १९६७ मध्ये के.ए. अब्बास यांच्या ‘बंबई रात की बाहों में’ या सिनेमात दिसली होती. पण हा सिनेमा फारसा चालला नाही. त्यानंतर १९७५ पासून ती हॉलिवूडच्या सिनेमांमध्ये दिसू लागली.

भारतातही लोकप्रिय असलेल्या खंबाटाने १९७९ मध्ये आलेल्या ‘स्टारट्रेक- द मोशन पिक्चर’ या सिनेमात लेफ्टनंट इलियाची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी हजारो कलाकारांनी ऑडिशन दिल्या होत्या, पण त्यातून परसिसची निवड करण्यात आली. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला टक्कल करावे लागणार होते. परसिसने ही अट एका क्षणात मान्य करुन टक्कल केले.

या भूमिकेमुळे ती सिनेमांच्या इतिहासात अजरामर झाली. परसिस खंबाटा ही जगातील पहिली टक्कल करणारी अभिनेत्री झाली. तसेच ती पहिली भारतीय अभिनेत्री होती जिला ऑस्कर पुरस्कार देण्याचा मान मिळाला होता. १९८३ मध्ये जेम्स बॉण्डचा सिनेमा ‘ऑक्टोपसी’मध्ये मुख्य भूमिका करण्याची संधी मिळाली होती.

भारतीय मर्यादांचे उल्लंघन होईल, असे कोणतेही काम करणार नाही, असे वचन तिने आईला दिलेले असल्यामुळे तिने या सिनेमाला नकार दिला. १८ ऑगस्ट १९९८ मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने तिचे निधन झाले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Miss india persis khambatta birthday special