तब्बल २१ वर्षाने भारताने ‘मिस युनिव्हर्स २०२१’चा खिताब जिंकला. भारताची सौंदर्यवती हरनाझ संधू ‘मिस युनिव्हर्स २०२१’ या मुकुटाची मानकरी ठरली. यंदाची ‘मिस युनिव्हर्स’ ही स्पर्धा इस्त्रायलमध्ये पार पडली. तिच्याआधी सुश्मिता सेन आणि लारा दत्ता यांनी अनुक्रमे १९९४ आणि २००० मध्ये ‘मिस युनिव्हर्स’चा खिताब जिंकला होता. त्यानतंर तब्बल २१ वर्षाने भारताला ‘मिस युनिव्हर्स’चा खिताब मिळाला. यानंतर तिने अनेक प्रसारमाध्यमांना मुलाखती दिल्या. यातील एका मुलाखतीत तिने तिला कोणत्या व्यक्तीला डेट करायला आवडेल? याबाबतचा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकल्यानंतर हरनाझ ही नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिने एका प्रसारमाध्यमाला मुलाखत दिली. यावेळी तिला तुला कोणत्या व्यक्तीला डेट करायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी हरनाझला विचारण्यात आले की एखादा श्रीमंत व्यक्ती आणि संघर्षशील तरुण यांच्यापैकी तू कोणाची निवड करशील? असेही तिला विचारण्यात आले.

यावर उत्तर देताना हरनाझ म्हणाली, “मला असे वाटते की मला एका संघर्षशील तरुणाला डेट करायला नक्कीच आवडेल. कारण मी स्वतः संघर्ष केला आहे आणि यापुढेही तो करत राहीन. त्यामुळे एक व्यक्ती म्हणून माझा विश्वास आहे की संघर्ष करणे महत्वाचे आहे. त्यामुळे आपण आपल्या कामगिरीला महत्त्व देऊ शकतो.”

‘मिस युनिव्हर्स’चा खिताब जिंकल्यानंतर हरनाज संधूबद्दल गूगलवर नेटकऱ्यांनी सर्च केले ‘हे’ प्रश्न

दरम्यान यानंतर हरनाझला तिच्या बॉलिवूड करिअरबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी तिने यावर स्पष्टीकरण दिले. “आता नुकतंच हे सर्व सुरु झाले आहे. त्यामुळे याबाबत काहीही सांगणे घाईचे होईल. पण मला असे वाटते की मी सर्वांना याबद्दल नक्कीच अपडेट देईन. कारण मी आता जे काही निर्णय घेते ते फार विचारपूर्वक घेते. त्यामुळे काळजी करू नका, हरनाझ तुम्हाला नक्कीच अपडेट करेल,” असेही तिने सांगितले.

कोण आहे हरनाझ संधू?

चंदीगडच्या हरनाझ संधूचा जन्म शीख कुटुंबात झाला. फिटनेस आणि योगाची आवड असलेल्या हरनाझने किशोरवयातच सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. तीने २०१७ मध्ये मिस चंदीगडचा किताब जिंकला होता. २०१८ मध्ये, तिला मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया २०१८ चा अवॉर्ड मिळाला होता. दोन प्रतिष्ठित खिताब जिंकल्यानंतर, हरनाझने मिस इंडिया २०१९ मध्ये भाग घेतला. तिथे तिने टॉप १२ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले. या वर्षी सप्टेंबरमध्ये तिने मिस दिवा युनिव्हर्स इंडिया २०२१ चा मुकुट पटकावला. ती पब्लिक एडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Miss universe 2021 harnaaz sandhu says i would like to date a young struggling man know why nrp