Miss Universe 2024 : ‘मिस युनिव्हर्स २०२४’च्या विजेत्या सौंदर्यवतीचं नाव अखेर जाहीर झालं आहे. डेनमार्कची २१ वर्षांची विक्टोरिया कजेर थेलविगने (Victoriya Kjaer) ‘मिस युनिव्हर्स २०२४’चा खिताब जिंकला आहे. या ‘मिस युनिव्हर्स २०२४’च्या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणारी १८ वर्षांची सौंदर्यवती रिया सिंघा टॉप-१२मधूनच बाहेर झाली. या स्पर्धेत १२५ देशातून १३० सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता.

भारताची सौंदर्यवती रिया सिंघाने याआधी ‘मिस युनिव्हर्स इंडिया २०२४’चा खिताब जिंकला होता. देशभरातून ५० हून अधिक तरुणींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या सर्वांना मागे टाकून १८ वर्षांची रिया ‘मिस युनिव्हर्स इंडिया २०२४’ ठरली आणि तिने आता जागतिक स्तरावर ‘मिस युनिव्हर्स’मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. यंदा भारताकडे चौथ्यांदा ‘मिस युनिव्हर्स’चा खिताब जिंकण्याची संधी होती. पण, रिया टॉप-१२ मधूनच बाद झाली. याआधी १९९४साली अभिनेत्री सुष्मिता सेनने पहिल्यांदा ‘मिस युनिव्हर्स’चा खिताब भारताच्या नावे केला होता. त्यानंतर लारा दत्ता आणि हरनाज संधु मिस युनिव्हर्स झाली होती.

On December 13 and 14 there will also meteor shower in space and feast for astronomy lovers
आकाशात १३, १४ डिसेंबरला उल्कावर्षाव; पृथ्वी लहान-मोठ्या कणांजवळून…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Neelam Bhardwaj becomes youngest Indian woman Batter to hit List A double hundred
१३७ चेंडूत २०० धावा! भारताच्या लेकीने घडवला इतिहास; सर्वात कमी वयात द्विशतक झळकावणारी पहिली महिला फलंदाज
Surya Shani Yuti 2025
२०२५ ची सुरूवात ‘या’ तीन राशींसाठी नुकसानदायक; दोन मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्याने आर्थिक समस्या उद्भवणार
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
kharmas 2024 horoscope surya gochar 2024 in marathi
Kharmas 2024: १५ डिसेंबरपासून ‘या’ चार राशींवर मिळेल बक्कळ पैसा! खरमास सुरू होताच सूर्यदेवाच्या आशीर्वादाने धनलाभाची संधी
Lucky Numerology 2025
Lucky Numerology 2025: ‘या’ तिथीला जन्मलेल्या लोकांचा नववर्षात होणार भाग्योदय, बँक बॅलन्स वाढणार, नोकरीत मिळणार यश
jaipur literature festival will be held from january 30 to february 3 zws
बुकबातमी : जयपूर लिटफेस्टमध्ये यंदा मराठीसुद्धा…

हेही वाचा – ‘इंद्रायणी’ मालिकेत झळकल्यानंतर मुक्ता बर्वेची खास पोस्ट, म्हणाली, “कितीतरी दिवसांनी…”

‘मिस युनिव्हर्स २०२४’मधील टॉप-५

७३वी ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धा यंदा मेक्सिकोमध्ये आयोजित करण्यात आली होती. मेक्सिको, नायजेरिया, थायलंड, व्हेनेझुएला आणि डेन्मार्क अंतिम फेरीत पोहोचले. कारण टॉप-१२ स्पर्धकांमध्ये या देशांच्या सौंदर्यवतींनी आपल्या देशांची अद्वितीय संस्कृती आणि सौंदर्य प्रतिबिंबित करणारे आकर्षक गाऊन सादर केले होते.

हेही वाचा – Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3 : ‘भूल भुलैया ३’ ‘सिंघम अगेन’ चित्रपटावर झाला वरचढ, तिसऱ्या शनिवारी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

‘मिस युनिव्हर्स २०२४’चे जज कोण होते?

ज्युरी पॅनेलमध्ये फॅशन, मनोरंजन, कला आणि व्यवसाय जगातील प्रसिद्धी व्यक्तींचा समावेश केला होता. यामध्ये एमिलियो एस्टेफान, मायकेल सिन्को, इवा कॅव्हली, जेसिका कॅरिलो, जियानलुका वाच्ची, नोव्हा स्टीव्हन्स, फारिना, गॅरी नाडर, गॅब्रिएला गोन्झालेझ आणि कॅमिला गुरबिटी यांनी ‘मिस युनिव्हर्स २०२४’ स्पर्धेचं परीक्षण केलं.

रिया सिंघा कोण आहे?

हेही वाचा – लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठा अपघात; विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू

‘मिस युनिव्हर्स २०२४’मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी रिया सिंघा मूळची अहमदाबाद, गुजरातची आहे. ती अवघ्या १८ वर्षांची आहे. रियाने परफॉर्मिंग आर्ट्समध्ये पदवी घेतली असून ती फॅशन डिझायनर आहे. तिचे इन्स्टाग्रामवर १ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Story img Loader