मिस युनिव्हर्स ही गेली अनेक वर्ष जगभरात सर्वात प्रतिष्ठित मानली जाणारी सौंदर्य स्पर्धा आहे. नुकताच या स्पर्धेबाबत एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. प्रतिष्ठित मिस युनिव्हर्स स्पर्धेत विवाहित महिलांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. २०२३ पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. २०२३ पासून विवाहित महिला आणि माता या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात. यापुढे विवाह आणि पालकत्व यांचा स्पर्धकांच्या पात्रतेवर परिणाम होणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : करीना कपूर, अर्जुन कपूर होत आहेत ट्रोल, तर शाहरुखचं होतंय कौतुक.. जाणून घ्या कारण

आत्तापर्यंत, मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या नियमांमध्ये असे सांगितले होते की, मिस युनिव्हर्स विजेते हे अविवाहित असले पाहिजेत आणि त्यामुळे त्यांचा संपूर्ण कार्यकाळ विजेतेपदासह राहील. त्याचप्रमाणे विजेत्यांनी मिस युनिव्हर्स म्हणून राज्य करताना गर्भवती होऊ नये अशी अपेक्षा केली जाते, परिणामी मातांना वगळले जाते.

मेक्सिकोचे प्रतिनिधित्व करत मिस युनिव्हर्स २०२० चा मुकुट पटकावलेल्या आंद्रिया मेझाने या नवीन नियम बदलाचे स्वागत आहे. तिने ‘इनसाइडर’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “मिस युनिव्हर्स स्पर्धेबाबत घेतलेला हा नवीन निर्णय स्वागतार्ह आहे. हा निर्णय मला प्रामाणिकपणे आवडला. जसा समाज बदलत आहे आणि स्त्रिया आता नेतृत्वाच्या पदांवर विराजमान होत आहेत जे पूर्वी फक्त पुरुषच करू शकत होते. आता स्पर्धेचे नियमही बदलले आणि कुटुंब असलेल्या महिलांसाठी ही स्पर्धा खुली झाली.”

हेही वाचा : बहुचर्चित ‘१७७०’ चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

भारताच्या हरनाझ कौर संधूने मिस युनिव्हर्स २०२१ च्या मुकुटावर आपले नाव कोरले. पंजाबस्थित हरनाझ संधूने इस्रायलच्या इलात येथे झालेल्या ७० व्या मिस युनिव्हर्स २०२१ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. हरनाझ सिंधू ही मिस युनिव्हर्स हा किताब पटकावणारी तिसरी भारतीय ठरली. त्यापूर्वी १९९४ मध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन हिला हा किताब मिळाला होता तर २००० मध्ये लारा दत्ता ही मिस युनिव्हर्स ठरली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Miss universe pageant set to welcome married women and mothers from 2023 rnv