अमेरिकेची वीस वर्षीय ओलिव्हीया ही विश्वसुंदरी किताबाची मानकरी ठरली आहे. अनेक वर्षांनी विश्वसुंदरीचा किताब एका अमेरिकन युवतिला मिळाला आहे. या आधी १९९७ साली बुरक ली या अमेरिकन सुंदरीला हा किताब मिळाला होता. लॉस वेगसच्या प्लॅनेट हाँलीवुड कॅसिनोमध्ये ही स्पर्धा झाली. एकूण ८८ देशांच्या सुंदरींवर मात करत ओलिव्हीयाने विश्वसुंदरीचा किताब पटकावला. फिलिपिन्सच्या जेनी तुगोनोग हीला दुस-या तर व्हनेजूव्हेलाची इरीन एसरला तिस-या स्थानाचा मान मिळाला आहे. यावर्षी विश्वसुंदरी स्पर्धेत भारताच्या पदरात निराशाचं पडली आहे. यात बिहारमधील समस्तीपुरायेथील शिल्पा सिंगला १६ व्या स्थानावरच समाधान मानावे लागले आहे.     

Story img Loader