मिस युनिव्हर्स ही स्पर्धा पुढील आठवड्यात होणार असून त्याआधीच ती चर्चेत आली आहे. थायलंडमधील बँकॉक येथे होणाऱ्या या ६७ व्या मिस युनिव्हर्स या स्पर्धेतील दोन स्पर्धकांमध्ये वाद झाले आहेत. यावर्षी स्पर्धेला ९४ देशातील सौंदर्यवती सहभागी झाल्या आहेत. सोबतच्या स्पर्धकावर निंदनीय टीपण्णी केल्याचा आरोप सौंदर्यवतींवर करण्यात आला आहे. मिस युएसएसोबतच मिस कोलंबिया आणि मिस ऑस्ट्रेलिया यांच्यावर छळवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. स्पर्धेदरम्यान त्यांनी मिस कंबोडिया आणि मिस व्हिएतनाम यांची छळवणूक झाली आहे.

एका इन्स्टाग्राम पेजवर करण्यात आलेल्या पोस्टमुळे ही गोष्ट उघड झाली आहे. यामध्ये काही व्हिडियो अपलोड करण्यात आले आहेत. तर स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात निवडून आलेल्या तीन स्पर्धक वर्णावरुन टिका करत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मिस युएसए मिस कंबोडिया आणि मिस व्हिएतनाम यांच्या इंग्रजीवर टीका करत असल्याचे व्हिडियोमध्ये दिसत आहे. या दोघीही इंग्रजी बोलत नसल्याने मिस युएसए त्यांच्यावर टीका करत आहे. अशाप्रकारे इंग्रजी न बोलणे हे वेगळे ठेवणारे आणि गोंधळात टाकणारे आहे असे मिस युएसए म्हणते. अशाप्रकारे इंग्रजीवरुन इतर स्पर्धकांची खिल्ली उडवल्याने नेटीझन्सनी मात्र मिस युएसए, मिस मिस कोलंबिया आणि मिस ऑस्ट्रेलिया यांना खडे बोल सुनावलेत.