Miss World 2024 Winner: चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोव्हा हिने ७१वा ‘मिस वर्ल्ड’चा खिताब जिंकला. ११२ देशातल्या सौंदर्यवतींना मागे टाकून अवघ्या २४व्या वर्षी क्रिस्टिना ‘मिस वर्ल्ड’ झाली. गेल्या वर्षीची विजेती कॅरोलिना बिलावस्का हिने क्रिस्टिनाच्या डोक्यावर ‘मिस वर्ल्ड’चा क्राउन घातला. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेकशन सेंटरमध्ये ७१वा ‘मिस वर्ल्ड २०२४’चा महाअंतिम सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदा ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी १२ सदस्यांकडे होती. यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन, पूजा हेगडे, मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या सीईओ ज्युलिया एव्हलिन मॉर्ले, बँकर, गायिका व समाजसेविका अमृता फडणवीस, चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला, माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग, पत्रकार रजत शर्मा, बेनेट, कोलमन अँड को. लिमिटेडचे डिरेक्टर विनीत जैन, मिस वर्ल्ड इंडियाचे चेअरमन आणि स्ट्रॅटेजिक पार्टनर, हॉस्ट जामिल सैदी यांचा समावेश होता. याशिवाय पूर्वाश्रमीच्या ३ ‘मिस वर्ल्ड’ विजेत्या देखील यात होत्या. या १२ परीक्षकांच्या प्रश्नांना सामोरे गेल्यानंतर अंतिम फेरीत टॉप-४ सौंदर्यवतींना ‘शार्क टँक इंडिया’च्या शार्क्सच्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागली. ‘मिस वर्ल्ड २०२४’चा महाअंतिम सोहळ्याचे सूत्रसंचालन करण जोहर व ब्यूटी क्वीन मेगन यांग यांनी केलं. तसंच या सोहळ्यात शान, नेहा कक्कर, टोनी कक्कर परफॉर्म केलं. तर आज आपण ‘मिस वर्ल्ड २०२४’ क्रिस्टिना पिस्कोव्हा कोण आहे? काय काम करते? जाणून घेऊया…

हेही वाचा – फ्लॉप चित्रपट, पतीवर छळाचे आरोप अन्…; ‘मिस वर्ल्ड’ झाल्यानंतर भारतीय सौंदर्यवतीचं करिअर ठरलं अपयशी, सध्या काय करते?

१९ जानेवारी १९९९ साली जन्माला आलेली क्रिस्टिना पिस्कोव्हा कायद्याचे आणि बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घेत आहे. २४ वर्षांची क्रिस्टिनाने शिक्षणाबरोबर मॉडेलिंगचं करिअर निवडलं. एवढंच नाहीतर तिच्या नावाची एक संस्था (Krystyna Pyszko Foundation) देखील आहे. तिने तंजानियामधील गरीब व गरजू मुलांसाठी काम केलं आहे. तसंच या मुलांसाठी तिने इंग्रजी शाळा सुरू केली आहे. ही शाळा सुरू करणं हा क्रिस्टिनासाठी अविस्मरणीय क्षण होता.

हेही वाचा – आतापर्यंत ‘या’ भारतीय सौंदर्यवतींनी जिंकलाय ‘मिस वर्ल्ड’चा खिताब, वाचा…

याशिवाय, क्रिस्टिनाला संगीत व कला क्षेत्रात खूप रस आहे. तिला बासरी व व्हायोलिन वाजण्याची आवड आहे. ५ फूट ११ इंच उंची असलेल्या क्रिस्टिनाला इंग्रजी, पॉलिश, स्लोवॉक आणि जर्मन या भाषा येतात. चेक रिपब्लिकची क्रिस्टिना ही दुसरी ‘मिस वर्ल्ड’ आहे. तिच्या आधी २००६मध्ये Tatana Kucharova हिने ‘मिस वर्ल्ड’चा खिताब जिंकला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Miss world 2024 winner krystyna pyszkova life and her work pps
Show comments