हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रुज आपल्या धमाकेदार अॅक्शन सीन्ससाठी ओळखला जातो. ‘मिशन इम्पॉसिबल’ या चित्रपट मालिकेत त्याने केलेले स्टंट पाहून आश्चर्यचकित व्हायला होतं. या मालिकेतील सातवा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचं शूटिंग सध्या ब्रिटनमधील ऑक्सफोर्डशायर येथे सुरु आहे. दरम्यान टॉम क्रुजने केलेल्या एका स्टंटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे हाच स्टंट करताना गेल्या महिन्यात टॉमचा अपघात झाला होता. या अपघातात तब्बल २० कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. परंतु मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टॉमने अखेर तो खतरनाक स्टंट पुर्ण केला आहे.
ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री संजना गलरानी अटक; ४ दिवसांत दुसरी अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात
Christopher McQuarrie and Tom Cruise are taking Mission: Impossible 7 to another level pic.twitter.com/eZaa5z8s5Y
— zach (@ZachMacieI) September 7, 2020
‘मिशन इम्पॉसिबल’ ही एक गुप्तहेर चित्रपटांची सीरिज आहे. या चित्रपटांची कथा इथर हंट या अमेरिकन गुप्तहेराभोवती फिरते. ही व्यक्तिरेखा अभिनेता टॉम क्रुज याने साकारली आहे. खरं पाहाता ही सीरिज अगदी जेम्स बॉण्डसारखीच आहे. परंतु यामध्ये बॉण्ड चित्रपटांपेक्षाही अधिक खतरनाक स्टंट्स पाहायला मिळतात. लक्षवेधी बाब म्हणजे हे सर्व स्टंट चित्रपटातील कलाकार स्वत:च करतात. किंबहुना स्टंट करण्याची तयारी असलेल्या कलाकारांनाच या चित्रपटात झळकण्याची संधी मिळते.
“तुम्ही स्वत:ला शेरलॉक होम्स समजता का?”; सोन्या अयोध्या ट्रोलर्सवर भडकली
‘मिशन इम्पॉसिबल’ सीरिजच्या चौथ्या भागात बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर झळकले होते. या चित्रपटाचं नाव ‘मिशन इम्पॉसिबल: घोस्ट प्रोटोकॉल’ असं होतं. या चित्रपटात अनिल कपूर यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यामुळे ‘मिशन इम्पॉसिबल’ फ्रेंचाईजी आता भारतातही खूप लोकप्रिय झाली आहे. दरम्यान टॉम क्रूसने केलेल्या या नव्या स्टंटमुळे प्रेक्षक आता या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.