आशा भोसले या बॉलिवूडमधील दिग्गज गायिका आहेत. त्याच्या सुमधूर आवाजाचे सगळेच दिवाने आहेत. आशा भोसले या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसत आहे. त्या छोट्यात छोट्या गोष्टींची दखल घेतं असतात. नुकताच त्यांनी हॉलिवूडमधील लोकप्रिय आभिनेता टॉम क्रुझचा एक फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेक लोकांना ठाऊक नाही पण हॉलिवूड आभिनेता टॉम क्रुझला चिकन टिक्का मसाला हा भारतीय पदार्थ प्रचंड प्रमाणात आवडतो. त्यामुळे टॉमलाृ नुकताचं युकेमधील एका भारतीय रेस्टॉरंट बाहेर स्पॉट करण्यात आलं. या रेस्टॉरंटचे नाव ‘आशा बर्मिंगहॅम’ असून हे गायिका आशा भोसले यांचे आहे. टॉम याने रेस्टॉरंटच्या बाहेर काही स्टाफसोबत फोटो काढला आहे. या फोटोत तो खुश असल्याचे दिसून येत आहे. आशा भोसले यांना ही बातमी कळताच त्यांनी इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटो खाली त्यांनी कॅप्शन दिलं, “माल खूप आनंद झाला की टॉम क्रुझने आशा बर्मिंगहॅम या रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आस्वाद घेतला.”

आशा यांनी या पोस्टद्वारे टॉमला त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये पुन्हा आमंत्रण दिलं आहे. या रेस्टॉरंने देखील टॉम क्रुझचा हा फोटो शेअर केला आणि टॉमने चिकन टिक्का मसाला या भारतीय पदार्थाचा आस्वाद घेतल्याचं सांगितलं. हा पदार्थ त्याला एवढा आवडला की त्याने एक नाही तर दोनदा हा पदार्थ मागवला.

आशा भोसले यांनी शेअर केलेल्या या फोटोत टॉमने स्वेटर आणि जिन्स परिधान केली आहे. तसंच हाता जॅकेट धरले आहे. टॉम क्रुझ सध्या ‘मिशन इम्पॉसिबल’ सीरिजच्या सातव्या भागासाठी शूटिंग करत आहे. या सीरिजच्या चौथ्या भागात  बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर झळकले होते. या चित्रपटाचं नाव ‘मिशन इम्पॉसिबल: घोस्ट प्रोटोकॉल’ असं होतं. या चित्रपटात अनिल कपूर यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यामुळे ‘मिशन इम्पॉसिबल’ फ्रेंचाईजी आता भारतातही खूप लोकप्रिय झाली आहे. दरम्यान टॉम क्रूझ याने वेळात वेळ काढून भारतीय रेस्टॉरंटला भेट देली हे भारतीय फॅन्ससाठी खूप मोठी गोष्ट आहे. तसंच आशा भोसले यांनी देखील टॉम क्रुझला पुन्हा आमंत्रण देतं केलेली ही पोस्ट सोशाल मीडियावर व्हयरल झाली आहे.