मिशन इम्पॉसिबल या लोकप्रिय चित्रपट मालिकेचा सहावा भाग ‘मिशन इम्पॉसिबलः फॉलआउट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात अभिनेता टॉम क्रूज मुख्य भूमिकेत असून सुपरमॅन फेम हेन्री केविल खलनायकाच्या भूमिकेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिशन इम्पॉसिबल ही अॅक्शनपट मालिका अगदी जेम्स बॉण्ड पटांसारखीच आहे. यामध्ये अॅक्शनचा पुरेपूर भरणा असतो. सोबतच असतात ते थक्क करणारे स्टंट आणि आणि उत्कंठावर्धक पटकथा. नेहमीप्रमाणे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दलही प्रचंड उत्सुकता आहे.
ट्रेलरमध्ये टॉम क्रूज जबरदस्त अॅक्शन सीन करताना दिसत आहे. तसेच सुपरमॅन फेम हेन्री व रोमांस किंग टॉम यांच्यातील एका फाइट सीनमुळे इंटरनेवर या ट्रेलरची फार चर्चा सुरु आहे.

मिशन इम्पॉसिबलच्या ‘मिशन इम्पॉसिबल घोस्ट प्रोटोकॉल’ या चौथ्या भागात बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर झळकल्यामुळे या चित्रपट मालिकेची लोकप्रियता भारतातही वाढली. चित्रपट २७ जुलै २०१८ला भारतात २डी व थ्रीडी प्रकारात प्रदर्शित होईल. या चित्रपटात टॉम व हेन्री व्यतीरिक्त सायमन पेग, रेबेक फर्ग्यूसन, विंग रेम्स, शॉन हॅरिस हे मोठे कलाकार झळकणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mission impossible fallout trailer