ज्या चित्रपटाने अमिताभ बच्चनना सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला त्या ‘ब्लॅक’मध्ये आपण भयंकर चुका केल्या होत्या, असे अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर म्हटले आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘ब्लॅक’मध्ये अंध मुलीची आणि तिच्या शिक्षकाबरोबर असलेल्या नातेसंबंधाविषयीची कथा आहे. ‘ब्लॅक’मधील चुकांचा साक्षात्कार अमिताभना झालाय तो नुकत्याच झालेल्या फ्लॉरेन्स येथील ‘रिव्हर टू रिव्हर’ महोत्सवामुळे. या महोत्सवात शुभारंभाचा चित्रपट म्हणून ‘ब्लॅक’ दाखवण्यात आला आणि तो पाहण्यासाठी अमिताभनाही आमंत्रित करण्यात आले होते. सगळ्यांबरोबर अगदी पाहुण्यांच्या खुर्चीत बसून ‘ब्लॅक’ पाहणाऱ्या अमिताभना बऱ्याच प्रसंगात आपल्या चुका दिसल्या. ‘मला जेव्हा त्या चुका जाणवल्या तेव्हा आजूबाजूंच्यानाही त्या चुका लक्षात आल्या आहेत का़, हे मी पहात होतो. आणि त्यांच्यापैकी कोणालाच या चुका जाणवल्या नाहीत हे जेव्हा मला लक्षात आले तेव्हा क्षणभरासाठी का होईना मला आनंद झाला. पण तो आनंद क्षणभरापुरताच होता’, असे अमिताभने म्हटले आहे.
तुमच्या चुका शिल्लक राहतात तेव्हा तो सल तुम्हाला टोचत असतो. पण, तुम्ही ती चुक सुधारू शकत नाही. ‘ब्लॅक’ चित्रपटातील जेवणाच्या टेबलवर घडणारा जो संवाद आहे त्या प्रसंगात मी एक भयंकर चूक केली आहे. अजूनही तो प्रसंग, ती चूक माझा पिच्छा सोडत नाही, असे सांगणाऱ्या अमिताभनी आपल्या चाहत्यांशी ब्लॉगवर संवाद साधताना तुम्हाला तो प्रसंग सांगूनही त्यातली चूक लक्षात येणार नाही, असा दावा केला आहे. ब्लॉगवर अख्खा प्रसंग अमिताभ यांनी वर्णन केला आहे पण, त्या प्रसंगात त्यांच्याकडून नेमकी काय चूक झाली आहे हे शोधण्याचे आवाहन त्यांनी चाहत्यांना केले आहे. ‘ब्लॅक’ पुन्हा बघितल्याने मला आनंद तर दिलाच; पण चुका शोधून दिल्या त्याचाही आनंद आहे, असे अमिताभ यांनी म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा