एस.एस. राजामौलींच्या दिग्दर्शनात बनलेल्या ‘बाहुबली २ या चित्रपटाबद्दल काय आणि किती बोलावं असाच प्रश्न आता अनेकांना पडतो आहे. ‘माहिष्मती साम्राज्य’, ‘भल्लालदेव’, ‘बाहुबली’ आणि इतर पात्रांच्या बळावर राजामौलींनी या भव्य चित्रपटाचा घाट घातला आणि तो यशस्वीपणे प्रेक्षकांसमोर सादर केला. २८ एप्रिलला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची सर्वदूर प्रशंसा होत आहे. पण, परफेक्शनची दुसरी बाजू असणाऱ्या या चित्रपटातही काही चुका झाल्या आहेत. अर्थात या गोष्टीवर अनेकांचा विश्वासही बसणार नाही. किंबहुना चित्रपटासाठीच्या उत्सुकतेपोटी या गोष्टींकडे कोणाचं लक्षंच गेलं नसावं. पण, या चुका हेरणारे काही कमी नाहीत हेसुद्धा नाकारता येणार नाही. काही इंग्रजी वेबसाइट्सने ‘बाहुबली २’मधील याच चुका समोर आणल्या आहेत.

चूक क्रमांक १- भल्लालदेव आणि बाहुबलीच्या कपाळावर असणारा टिळा
कथेप्रमाणे विचार करायचा झाला तर, ‘बाहुबली’ आणि ‘भल्लालदेव’ हे दोघंही भाऊ आहे. मुख्य म्हणजे त्यांचं कूळही एकच आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार राजे-रजवाडे त्यांच्या कपाळावर कुळाचं प्रतिक किंवा चिन्हाचा टिळा लावतात. पण, इथे मात्र एकाच कुळातील असूनही बाहुबलीच्या कपाळावर चंद्राचं प्रतिक असणारा टिळा पाहायला मिळत आहे. तर, भल्लालदेवच्या कपाळावर सूर्याचं प्रतिक असणारा टिळा पाहायला मिळत आहे. आता टिळ्यांमध्ये ही अशी विविधता दाखवण्यामागचं कारण काय? हे राजामौलीच सांगू शकतील.
prabhas-rana

चूक क्रमांक २- कटप्पा बाहुबलीला मारतानाचं ते दृश्य आठवतंय का?
कटप्पाने बाहुबलीला का मारलं या एका प्रश्नापोटी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांमध्ये गर्दी केली आणि राजामौलींनीही प्रेक्षकांना निराश केलं नाही. पण, कटप्पाने बाहुबलीला मारतानाचं ते दृश्य तुम्ही टक लावून पाहिलं का? कटप्पाने बाहुबलीला मारलं तेव्हा तो पडताना एका दगडाचा आधार घेऊन बसतो.. असं दाखवण्यात आलं आहे. पण, याच दृश्याच्या आधारे दाखवण्यात आलेल्या पोस्टरमध्ये असा कोणताही दगड दिसत नाहिये. काही लक्षात येतंय का?
b-2

इतका खर्च करत भव्यतेची अनुभूती देणाऱ्या या चित्रपटातील चुका कोणाच्याही लक्षात आल्या नसल्या तरीही आता मात्र चुका शोधण्याकडे अनेकांचा कल दिसतोय. असो.. राजामौलींची ही चूक-भूल माफ करत प्रेक्षकांनी त्यांच्या चित्रपटाला जो काही प्रतिसाद दिला आहे तो अद्वितीय आहे असंच म्हणावं लागेल.

Story img Loader