मित्र-मैत्रिणी, धमालमस्ती, कॉलेजचं बिंधास्त आयुष्य हे सगळंच आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. प्रत्येकाच्या आठवणींमध्ये असलेला आणि म्हणूनच आपलासा वाटणारा हा काळ ‘आम्ही बेफिकर’ या चित्रपटात मांडण्यात आला आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

खूप काही मिळवण्याचा प्रयत्नात खूप काही गमावले आणि त्याच गमावलेल्या अनुभवातून पुन्हा स्वप्न रंगवले या आशयसूत्रावर हा चित्रपट बेतला आहे. आजच्या तरुणांशी संवाद साधणारा, त्यांच्या मनातले विचार पडद्यावर मांडणारा आणि त्यांच्याच भाषेत बोलणारा हा चित्रपट आहे. म्हणूनच चित्रपटाचा लुकही यूथफुल आहे. आजपर्यंत कॉलेज जीवनावर आधारित अनेक चित्रपट येऊन गेले असले, तरी त्यात ‘आम्ही बेफिकर’ नक्कीच वेगळा ठसा उमटवेल, असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला आहे.

‘आम्ही बेफिकर’मध्ये मिताली मयेकर आणि सुयोग गोऱ्हे ही जोडी मुख्य भूमिकेत झळकणार असून हा चित्रपट येत्या २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मिताली, सुयोगसोबत राहूल पाटील, स्वप्नील काळे आणि अक्षय हाडके यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हरिहर फिल्मनिर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन कविश्वर मराठे यांनी केलं आहे.

Story img Loader