सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. दोघेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. मध्यंतरी दोघांच्या फ्रान्स-स्पेन ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. सध्या मिताली मुंबईत असून, अभिनेता सिद्धार्थ चांदेकर कामानिमित्त लंडनमध्ये आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा ‘बवाल’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित; दुबईत लॉन्च होणार ट्रेलर

सिद्धार्थ, लंडनमधील विविध जागांचे सुंदर फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करीत असतो. अलीकडेच अभिनेत्याने लंडनमधील एका सुंदर नदीचा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. याला कॅप्शन देत सिद्धार्थने “मला आशा आहे की स्वर्ग असाच असतो…अन्यथा मी इथेच राहीन” असे म्हटले होते. मात्र, सिद्धार्थने शेअर केलेल्या या व्हिडीओपेक्षा यावर त्याची बायको मिताली मयेकरने केलेल्या कमेंटने सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा : “ताली बजाती नहीं, बजवाती हूं”, सुष्मिता सेनच्या बहुचर्चित ‘ताली’ सीरिजचे पोस्टर प्रदर्शित, अभिनेत्रीच्या लुकने वेधले लक्ष

मिताली कमेंट करत लिहिते की, “तुझे घर हे स्वर्गासारखे आहे आणि तुझी बायको खूप सुंदर आहे आता घरी परत ये…” यावर उत्तर देत सिद्धार्थने विमानाचा इमोजी शेअर केला आहे. अर्थात अभिनेत्याला लगेच विमानाने घरी येतो असे सूचित करायचे आहे. सिद्धार्थ चांदेकरच्या या व्हिडीओवर अनेकांनी “खरंच ही जागा खूप सुंदर आहे…” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा : बहुचर्चित ‘जी ले जरा’ चित्रपटातून प्रियांका चोप्रा बाहेर? चर्चांना उधाण

दरम्यान, सिद्धार्थ-मितालीने अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यावर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. दोघेही त्यांच्या कामामध्ये कितीही व्यग्र असले तरी एकमेकांना अधिकाधिक वेळ देताना दिसतात. आता सिद्धार्थ लवकरच बहुचर्चित ‘झिम्मा २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mithali mayekar special comment on siddharth chandekar video in london sva 00