बॉलिवूडचे प्रसिध्द अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची सकाळी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ४ वाजता त्यांना रुग्णालयात भर्ती करण्यात आले. सकाळी अचानक त्यांना उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर त्यांना खूप ताप येऊन पोटात दुखायला लागल्याने कांदिवली येथील रुग्णालयात त्यांना भर्ती करण्यात आले. एक तासभर डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आल्यानंतर सहा वाजता त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. मात्र, त्यानंतर मिथुन हे दुस-या रुग्णालयात दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अभिनेते मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात
बॉलिवूडचे प्रसिध्द अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची सकाळी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
First published on: 18-05-2015 at 02:38 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mithun chakraborty admitted in hospital