विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट जवळपास दोन आठवडे बॉक्स ऑफिसवर गाजतोय. अगदी कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. प्रेक्षक आणि समीक्षकांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. या चित्रपटात अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे आणि या भूमिकेसाठी त्यांना सर्वाधिक मानधनही देण्यात आल्याची चर्चा आहे. पण मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्मानं अद्याप हा चित्रपट पाहिलेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मदालसा शर्मा ही मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षय चक्रवर्तीची पत्नी आहे. सध्या मदालसा स्टार प्लसवरील ‘अनुपमा’ या मालिकेत काव्याची भूमिका साकारत आहे. नुकतीच मदालसानं सासरे मिथुन चक्रवर्ती यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’वर प्रतिक्रिया दिली आहे. तिनं अद्याप हा चित्रपट पाहिलेला नाही. कारण कामाच्या बिझी शेड्युलमधून तिला चित्रपट पाहण्यासाठी वेळच मिळाला नाही.

आणखी वाचा- धनुषच्या चाहत्यांना आणखी एक धक्का! एक्स वाइफ ऐश्वर्यानं घेतला मोठा निर्णय

नुकत्याच एका मुलाखतीत मदालसाला, ‘काही लोक हा चित्रपट एक प्रोपोगेंडा सेट करण्यासाठी तयार करण्यात आल्याचं बोललं जातंय यावर काय सांगाल?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर मदालसा म्हणाली, ‘मी अद्याप हा चित्रपट पाहिलेला नाही. पण मला माहीत आहे की चित्रपट कोणत्या विषयावर तयार करण्यात आला आहे. आजूबाजूला पसरत असलेल्या नकारात्मकतेबद्दल मला बोलायचं नाही. मी फक्त एवढंच सांगेन की हा चित्रपट खूपच सुंदर पद्धतीने तयार करण्यात आला आहे. चित्रपटाच्या माध्यमातून बरीच माहिती देण्यात आली आहे.’

आणखी वाचा- तब्बल ३ महिन्यांनंतर समोर आलं विकी- कतरिनाच्या लग्नाचं धक्कादायक सत्य, विवाहित असूनही…

दरम्यान ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं असलं तरी आज भारतात एक वर्ग असाही आहे. ज्यांनी या चित्रपटाला सातत्यानं विरोध केला आहे. काही लोकांच्या मते विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटात सत्याची तोडमोड करून कथा मांडली आहे. ज्यामुळे मुस्लीम लोकांचा तिरस्कार केला जात आहे. मात्र यावर विवेक अग्निहोत्रींचं म्हणणं आहे की त्यांनी या चित्रपटात केवळ सत्य घटना दाखवली आहे. मात्र आता त्यांना यावरुन काहीही कारण नसताना वादात ओढलं जात आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mithun chakraborty daughter in law madalsa sharma did not watch the kashmir files mrj