प्रसिद्ध भोजपुरी गायिका शिल्पी राज ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी शिल्पी राजचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सध्या तिच्या या व्हिडीओ जोरदार चर्चा सुरु आहे. यानंतर अनेकांनी तिच्यावर टीका केली होती. नुकतंच शिल्पीने या आक्षेपार्ह व्हिडीओवर स्पष्टीकरण दिले आहे. ‘ई टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तिने याबाबत स्पष्टपणे सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याबाबत बोलताना ती म्हणाली, “मी आतापर्यंत तो MMS व्हिडीओ पाहिलेला नाही. माझ्या नावाने एक व्हिडीओचा व्हायरल होत आहे, असे मला कोणीतरी सांगितले. त्या व्हिडीओतील ती मुलगी कोण आहे, याचा विचार करुन मला धक्का बसला. पण सत्य हे आहे की त्या व्हिडीओतील ती मुलगी मी नाही. माझी बदनामी करण्याचे हे सर्व षड्यंत्र रचलं गेले आहे.”

यावेळी शिल्पीला विचारण्यात आले की, “तुझ्याविरुद्ध असे घाणेरडे षडयंत्र कोण रचू शकतं? तुला कुणावर संशय आहे का? असे विचारले असता ती म्हणाली, ‘नाही, मी आता याबाबत काहीही सांगू शकत नाही. पण सिनेसृष्टीत जर कोणी प्रगती करत असेल तर लोक तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी बोलत राहतात. त्यांना स्त्रियांबद्दल काहीही आदर नसतो. मी याप्रकरणी न्यायालयात दावा देखील दाखल केला आहे. अशाप्रकारे एखाद्या व्हिडिओमध्ये कोणाचेही नाव जोडणे चुकीचे आहे.”

“मला सिनेसृष्टीतील कोणाचाही फोन आलेला नाही. पण माझ्या मॅनेजरला यासंदर्भात अनेक फोन आले आहेत. ज्यानंतर मी प्रचंड तणावग्रस्त झाली आहे. त्याने मला फोन करुन याबाबतची माहिती दिली होती”, असेही ती म्हणाली.

Hindi National Language Row stories : हिंदी भाषेवरील ‘त्या’ वादावर सोनू सूदची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला “भारतात फक्त एकच भाषा…”

दरम्यान शिल्पीने तिच्या करिअरमध्ये भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव आणि पवन सिंह यांच्यासह काम केले आहे. ‘जाड़ा लागत’, ‘बस कर पगली’, ‘झगड़ा’, ‘बबुआ के खुस कर द’, अशी प्रसिद्ध गाणी तिने गायली आहेत. तिने बारावीत असल्यापासूनच गाणे गाण्यास सुरुवात केली होती.