महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अभिनेते नाना पाटेकर यांना पोलिस सुरक्षा पुरविण्यासाठीची मागणी करण्यात आली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द अटॅक्स ऑफ २६/११’ या चित्रपटात नाना पाटेकर यांनी पोलिस अधिका-याची भूमिका केली आहे.
मनसेचे खासदार राम कदम पीटीआयशी बोलतांना म्हणाले, ”नाना पाटेकर हे देशाचा अमूल्य ठेवा आहेत. २६/११ च्या हल्ल्यावर आधारीत चित्रपटातील पोलिस अधिका-याची भूमिका नाना पाटेकर यांनी उत्कृष्ठपणे बजावली आहे.”
कदम म्हणाले की, अतिरेकी संघटनांना चित्रपटातील नाना पाटेकरांची भूमिका न आवडण्या सारखी आहे. मनसेला असे वटते की नानांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, यासाठीच आम्ही त्यांच्या सुरक्षिततेची मागणी केली आहे.

Story img Loader