मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीला दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी अनेक मराठी, हिंदी मालिकांसह चित्रपटांचेही शूटिंग सुरू असते. मात्र, आता याच चित्रनगरीतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी सरकारला जाब विचारला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर हे कायमच सिनेसृष्टीबद्दल सतर्क असतात. ते कायमच याबद्दल भाष्य करताना दिसतात. नुकतंच अमेय खोपकर यांनी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी काही फोटो पोस्ट केले आहेत.
आणखी वाचा : Video : “पुढे कसा जातोस तेच बघतो”, मुंबईच्या फिल्मसिटीत प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाची अडवणूक; म्हणाले “अतिरेकी पकडल्यागत अंगावर…”

What Narendra Modi Said?
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, “नेहरू-इंदिरा गांधींपासून काँग्रेसच्या सरकारांमध्ये १२ लाखांवर ३ लाखांचा कर…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
jaideep ahlawat on nepotizam and alia bhatt
‘पाताल लोक’ फेम जयदीप अहलावतचे नेपोटिझमवर भाष्य; आलिया भट्टबद्दल म्हणाला, “त्यात तिची चूक काय?”
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Pimpri , fire, worker house, cash burnt, loksatta news,
पिंपरी : कामगाराच्या घराला भीषण आग, पाच लाखांची रोकड जळून खाक

या फोटोत गोरेगाव फिल्मसिटीकडे जाणारा रस्ता दिसत आहे. या रस्त्यावर सर्वत्र खड्डे पाहायला मिळत आहे. यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याप्रकरणी अमेय खोपकरांनी ट्विट केले आहे.

“मुंबईला मायानगरी म्हणतात ते या दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच फिल्मसिटीमुळे. इथे ४२ आउटडोअर शूटिंग लोकेशन्स आणि १६ स्टुडिओ फ्लोअर्स आहेत. टीव्ही मालिका, चित्रपट यांच्या शूटिंगसाठी हजारो माणसं इथे उपनगरातून येत असतात; पण आत प्रवेश केल्यावर अशा घाणेरड्या रस्त्यांवरून ये-जा करावी लागते. ग्लॅमर दिसलं की हुरळून जाणाऱ्या राजकारण्यांना हे खड्डे दिसत नाहीत? तुम्ही सुविधाच दिल्या नाहीत म्हणून उद्या हा चित्रपटउद्योग राज्याबाहेर गेला तर त्यांना चूक तरी कसं म्हणणार?”, असे ट्विट अमेय खोपकरांनी केले आहे.

आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने मोडला ‘वेड’चा रेकॉर्ड, आतापर्यंत कमावले इतके कोटी

दरम्यान, अमेय खोपकरांच्या या ट्विटनंतर अनेकजण यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. तसेच काहींनी यावर लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढावा, असे म्हटले आहे.

Story img Loader