स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा जीवनपट सध्या चर्चेत आहे. स्वामित्त्व हक्कावरून वाद निर्माण झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याबाबत संताप व्यक्त केलाय. तसंच, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी थेट दिग्दर्शक रणदीप हुड्डा याला इशाराच दिला आहे.
अमेय खोपकर यांनी दिग्दर्शक रणदीप हुड्डा याला पत्र लिहिले आहे. या पत्राची प्रत त्यांनी ट्वीटही केली आहे. “हिंदूहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट हिंदी भाषेतून जगभरात प्रदर्शित होणं ही तमाम सावरकरप्रेमींसाठी अभिमानाची गोष्ट आहे. लंडनमध्ये म्हणजेच थेट इंग्रजांच्या भूमीत इंग्रजांना आव्हान देऊन स्वातंत्र्यवीरांनी समस्त जगाला अचंबित केलं होतं. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये त्यांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. तरीही शेवटपर्यंत ते ब्रिटीशांपुढे झुकले नाहीत. भारतमातेला ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं, अशा स्वातंत्र्यवीरांची धगधगती गाथा मोठ्या पडद्यावर पाहण्याची मोठी उत्सुकता आहे”, असं खोपकर यांनी पत्रात लिहिलं आहे.
हेही वाचा >> “रणदीप हुड्डाने…”, महेश मांजरेकरांनी सांगितले स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बायोपिकमधून माघार घेण्याचे कारण…
ते पुढे म्हणाले की, “प्रदर्शनापूर्वी मात्र आता स्वामित्वहक्कांवरुन वाद सुरू झाला आहे, जो अतिशय दुर्दैवी आहे. हा वाद ताबडतोब थांबायला हवा, कारण यामुळे चित्रपट प्रदर्शनाला विलंब झाला तर तो खुद्द स्वातंत्र्यवीरांचा अपमान असेल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न कुणीही करु नये.”
“हा वाद त्वरित मिटवण्यात यावा आणि स्वातंत्र्यवीरांचं कार्य घराघरात पोचावं ही आमची भूमिका आहे. आम्ही दिलेल्या इशाऱ्याचा आपण योग्य आदर राखाल अशी आमची अपेक्षा आहे”, असा सूचक इशाराही अमेय खोपकर यांनी दिला आहे.
महेश मांजरेकरांची चित्रपटातून माघार
अभिनेता रणदीप हुड्डा सध्या त्याच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका रणदीप हुड्डा साकारणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रणदीप दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. रणदीपच्या हुड्डाच्या आधी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी महेश मांजरेकर यांना देण्यात आली होती. परंतु, काही काळानंतर अचानक महेश मांजरेकरांनी या प्रोजेक्टमधून माघार घेतली. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटातून माघार का घेतली? याविषयी सांगताना महेश मांजरेकर म्हणाले, “सगळ्यात आधी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती. परंतु, रणदीपने या चित्रपटाच्या कथेमध्ये अनेक बदल करण्याचा प्रयत्न केला. चित्रपटात होणाऱ्या बदलांमुळे मी हा प्रोजेक्ट सोडण्याचा निर्णय घेतला.”