हाँगकाँगमध्ये एका प्रसिद्ध २८ वर्षीय मॉडेल आणि सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरची हत्या झाली आहे. मॉडेल अॅबी चोई गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होती. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे एका घरात सापडले आहेत. घराच्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या सूप पॉटमध्ये तिचं डोकं तरंगताना आढळलं, तर तिचं धडही गायब असल्याची माहिती समोर आली आहे.
अकबराबद्दल शिकवलेला इतिहास मूर्खपणाचा; नसीरुद्दीन शाहांचं स्पष्ट मत
ज्या घरात अॅबी चोईचं डोकं सापडलं, ते घर तिच्या पूर्वाश्रमीच्या सासऱ्यांनी भाड्याने घेतलं होतं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीराच्या अवयवांसह मांस कापण्याचे मशीन आणि कपडे सापडले आहेत. तिचं धड आणि इतर अवयव गायब होते, तर डोकं फ्रिजमधील सूप पॉटमध्ये आढळलं. याप्रकरणी पोलिसांनी अॅबीचा पूर्वाश्रमीचा पती अॅलेक्स क्वांग, सासरा क्वांग काऊ आणि एक नातेवाईक अँथनी क्वांग यांना ताब्यात घेतलं व हत्येच्या आरोपाखाली कोर्टात हजर केलं.
वृत्तानुसार, अॅबीच्या हत्येचा संबंध तिचा पूर्व पती आणि त्याच्या कुटुंबातील आर्थिक वादाशी आहे. तिच्या कुटुंबातील लोक तिच्या आर्थिक व्यवहारावर नाखूष असल्याचंही समोर आलं होतं. या धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अॅबीने आतापर्यंत अनेक मॉडेलिंग असाइनमेंट केल्या होत्या. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. पहिल्या घटस्फोटानंतर तिने चेन रेस्टॉरंटच्या संस्थापकाचा मुलगा ख्रिस टॅमशी दुसरं लग्न केलं होतं. ती पूर्वीच्या सासरच्या मंडळींच्या नावाने विकत घेतलेली मालमत्ता विकण्याच्या तयारीत होती आणि त्यामुळेच त्यांनी तिचा खून केल्याची चर्चा आहे.