अभिनेत्री पूनम पांडे ही तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओंमुळे ओळखली जाते. तिच्या वागण्या बोलण्याने नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. काही दिवसांपूर्वी ती अभिनेता करणवीर बोहरा आणि पूनमचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ सोशल मिडियावर खूप चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा पूनम चर्चेत आली आहे.
पूनम पांडेने तिची मैत्रीण दिव्या अग्रवालच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीला मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार हजर होते. या पार्टीला पापाराझी हजर होते. पूनमने पार्टीत एंट्री घेताच पापाराझी तिच्याकडे फोटो मागू लागले तेव्हा ते हिंदीत बोलत होते. पूनम त्यांना विचारले “तुम्ही माझ्याशी मराठीत का नाही बोलत?” असा सवाल तिने केला.
पूनम पांडे कंगना रणौतच्या वादग्रस्त शो ‘लॉकअप’मध्ये दिसली होती. या शोमध्ये करणवीर बोहरादेखील होता. शोमधून बाहेर पडल्यानंतरही या दोघांचे बाँडिंग वाढले आहे. पूनम मूळची कानपूरची असून गेली अनेकवर्ष बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. २०१३ साली आलेल्या नशा या चित्रपटातून तिने पदार्पण केले. आपल्या बोल्ड फोटोमुळे ती अनेकदा वादात सापडते.