उर्फी जावेद हे नाव माहीत नाही अशी व्यक्ति सहसा तुम्हाला सापडणार नाही. सोशल मीडिया वापरत असो वा नसो उर्फी जावेद हे नाव कायम चर्चेत असतं. बेताल वक्तव्यं, चित्रविचित्र कपडे यासाठी उर्फी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. तिच्या वेशभूषेमध्ये ती सतत वेगवेगळे प्रयोग करत असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उर्फी जेव्हा जेव्हा हे असे वेगळे प्रयोग करते तेव्हा ती हमखास ट्रोलर्सच्या निशाण्यावर येते. टेलिव्हिजनमधून पदार्पण करणारी उर्फी तिच्या अभिनयासाठी नव्हे तर या चित्रविचित्र कपड्यांच्या फॅशनसाठी जास्त चर्चेत असते. नुकताच उर्फीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्येही ती नेहमीप्रमाणे तिच्या बोल्ड अवतारात दिसत आहे.

आणखी वाचा : फाल्गुनी पाठक नेहा कक्करला कोर्टात खेचणार? नव्या गाण्यामुळे निर्माण झालेल्या वादावर फाल्गुनीचं स्पष्टीकरण

या व्हिडिओमध्ये ती शाहरुख खानच्या ‘दर्द-ए-डिस्को’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे, सवयीप्रमाणे तिने कपडे घातले आहेत की नाही हा प्रश्न व्हिडिओ बघताना प्रेक्षकांना पडतोच पण या व्हिडिओमध्ये तीने एका वेगळ्या प्रकारचा मुखवटा चेहऱ्यावर घातला आहे. यामुळे तिचा चेहेरा संपूर्णपणे झाकला आहे. आरशाच्या तुकड्यांपासून बनलेला हा मुखवटा घालून उर्फीने हा व्हिडिओ शूट केला आहे. शिवाय याबरोबर तिने लिहिलं आहे की, “आता या पोस्टमध्ये मेकअप आणि हेयरस्टाइलचं क्रेडिट कोणाला देऊ?”

उर्फीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाऊंटवरही तो शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमुळे उर्फीला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. मुखवट्यामागे तोंड लपवल्याने लोकं तिला ट्रोल करत आहेत. काही लोकांनी तर उर्फीला या अवतारात पाहून राज कुंद्राची बहीण म्हणून कॉमेंट केली आहे. राज यानेसुद्धा मध्यंतरी असाच एक मास्क घातला होता त्यामुळेच उर्फीची शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राशी नेटकरी बरोबरी करत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Model actress urfi javed new viral video on social media people comapres her with raj kundra avn