काही दिवसांपूर्वी बौद्ध धर्माचे नेते दलाई लामा यांनी एका मुलाच्या ओठांवर चुंबन घेत असल्याचा आणि नंतर मुलाला ‘स्वतःची जीभ चोखण्याची’ विनंती करतानाचा एक व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होत होता. या फुटेजमध्ये दलाई लामा यांनी आपली जीभ पुढे करून मुलाला चोखण्यास सांगितली होती. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ही कृती अत्यंत ‘भीतीदायक’, ‘घृणास्पद’ आणि ‘निंदनीय’ असल्याचे अनेकांनी म्हंटले.
नुकतंच ‘बिग बॉस ७’फेम मॉडेल सोफिया हयात हिनेसुद्धा नुकतंच याबद्दल भाष्य केलं आहे. बिग बॉसमुळे सोफियाची लोकप्रिय झाली. सध्या ती लाईमलाइटपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते. नुकतंच तिने दलाई लामा यांच्या त्या व्हायरल व्हिडिओवर भाष्य केलं आहे. दलाई लामा यांना दुजोरा दिल्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.
आणखी वाचा : “ॲडल्ट चित्रपट बघायला जाताना मला…” सचिन पिळगांवकरांचा कपिल शर्माच्या कार्यक्रमात मोठा खुलासा
जेव्हा दलाई लामा यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा सोफिया हयातने यावर लगेच संतप्त प्रतिक्रिया दिली होती. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सोफिया म्हणाली होती की, “साऱ्या जगभरातून दलाई लामा यांच्या कृत्याचा विरोध होत असताना, काही भारतीय त्यांचं समर्थन का करत आहेत? या व्हिडिओतून केवळ बलात्कार आणि लहान मुलांचे लैंगिक शोषण या गोष्टींनाच प्रोत्साहन मिळतंय यामुळे या समस्यांकडे गांभीर्याने पाहिलं जात नाही. दलाई लामा यांचं समर्थंन करणाऱ्यांनी खबडून जागे व्हा, सारं जग पाहतंय तुम्ही काय करताय. मी कायम सत्य आणि लहान मुलांच्या हक्कासाठी लढा द्यायला तयार आहे. यौन शोषण अजिबात योग्य नाही.”
दलाई लामा यांच्या कृतीचा विरोध केल्यानंतर आता पुन्हा आपल्या मतावर फेरविचार करणारा एक व्हिडिओ सोफियाने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती दलाई लामा यांच्या बाजूने बोलत आहे. याविषयी सोफिया म्हणाली, “सध्या मी बऱ्याच कठीण गोष्टींचा सामना करत आहे. मी जो व्हिडिओ पाहून त्यावर प्रतिक्रिया दिली ती क्षणिक प्रतिक्रिया होती. दलाई लामा यांचा हेतू वाईट असेल असं मला अजिबात वाटत नाही.” सोफिया एक गायिका आणि मॉडेल आहे, सध्या ती नन म्हणून काम करत असल्याचा तिने दावा केला आहे. अध्यात्माचा मार्ग स्वीकारण्याआधी सोफियाने काही हिंदी चित्रपटातही काम केलं आहे.