मॉडेल, अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या बिनधास्त स्वभावासाठी आणि विचित्र कपड्यांसाठी नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे चित्र विचित्र कपडे परिधान केलेले फोटोज चांगलेच व्हायरल होतात आणि नेटकरी त्यावर भरूभरून प्रतिक्रियाही देत असतात. उर्फी कधी सिमकार्ड तर कधी ब्लेडने बनवलेला ड्रेस परिधान करते. याशिवाय तिने सेफ्टी पिन, वायर, सॅक, दोरी, काच असे अनेक आउटफिट्स बनवले आहेत.
मात्र आता उर्फीने याहून विचित्र ड्रेस परिधान केल्याचं समोर आलं आहे. यावेळी उर्फी जावेदने तिच्या अंगावर कपडे किंवा इतर वस्तूंऐवजी चार्जर असलेला मोबाईल टांगला होता. तिने स्वत: इंस्टाग्रामवर तिचा हा नवा लूक शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या अंगावर फक्त दोन फोन लटकलेले दिसत आहेत. याबरोबरच उर्फीने निळ्या रंगाचा कोट परिधान केलेला दिसत आहे.
आणखी वाचा : Video: गर्लफ्रेंडचं लग्न ठरल्यानंतर काय? किरण मानेंची ‘बिग बॉस मराठी’मधील कविता व्हायरल
ग्लॅमर गर्ल उर्फी जावेदचा निळ्या रंगाचा ब्लेझर आणि पँटसह मोबाईल आणि चार्जरच्या वायर्सनी बनवलेल्या बिकिनीचा लूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हे पाहून युजर्सनी या लूकवर कॉमेंट करायला सुरूवात केली आहे. अभिनेत्रीचा हा लूक चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे – “फुल चार्ज्ड”.
या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या आउटफिटसाठी लोकांनी उर्फीला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर कॉमेंट करताना एका यूजरने लिहिले की, “ही ठार वेडी झाली आहे, हिने तिच्या मर्यादा ओलांडल्या आहेत.” तर आणखी एका युजरने कॉमेंट केली “माझा फोनही चार्ज कर, उर्फी दीदी.” एका यूझरने तर तिला भारताबाहेर फेकून द्या, असेही कॉमेंटमध्ये लिहिले आहे. उर्फी ‘बिग बॉस ओटीटी’च्या पहिल्या सीझनचा भाग होती, बिग बॉसच्या घरातील उर्फीचा जास्त दिवस निभाव लागला नाही परंतु या काळात तिने लोकांचे भरपूर भरपूर मनोरंजन केले. आजकाल उर्फी जावेद अशाच चित्र विचित्र फॅशनसाठी चर्चेत असते.