नेटफ्लिक्स वरची अतिशय लोकप्रिय वेब सीरिज ‘मनी हाइस्ट’ने जगाला अक्षरशः क्रेझी केलं आहे. यातील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या लक्ष वेधी चोरांनी तब्बल चार सिझनमधून प्रेक्षकांना खिळवून ठेवले असून या सीरिजचा पाचवा आणि शेवटचा सिझन नुकताच प्रदर्शित झाला आहे. या अॅक्शन ड्रामा सीरिजमध्ये प्रोफेसर हा मास्टर माइंड दाखवण्यात आला आहे. याच्या नेतृत्वाखाली ही चोराची टोळी बँक ऑफ स्पेनमध्ये चोरी प्लान करते. प्रोफेसरची तल्लख बुद्धी, परफेक्ट प्लान आणि अभ्यासामुळे ही चोराची टोळी नेहमीच पोलिसांच्या एक पाऊल पुढे असते. यातील प्रोफेसरची भूमिका साकारणारा अल्वारो मोर्टेने ही भूमिका अतिशय उत्तम रित्या साकारली आहे. मात्र ही भूमिका मिळवणे इतक सोप नव्हते यासाठी अल्वारोला खुप मेहनत घ्यावी लागली होती.
अल्वारो मोर्टेच्या अभिनयामुळे प्रोफेसर हे ‘मनी हाइस्ट’ मधील सगळ्यांचे आवडीचे पात्र ठरले आहे. ‘ओसस’च्या वृत्तानुसार प्रोफेसरच्या भूमिकेसाठी निर्माते ५० वर्ष वय असेल अशा अभिनेत्याच्या शोधात होते. मात्र ते ‘मनी हाइस्ट’चे कास्टिंग डायरेक्टर्स होते, ज्यांनी अल्वारो मॉर्टे याचे नाव निर्मात्यांना सुचवले. कारण त्यांनी आधी त्याच्याबरोबर काम केले होते. मात्र शिफारस असूनही, स्पॅनिश अभिनेत्यासाठी ही मुख्य भूमिका मिळणे एव्हढे सोपे नव्हते. प्रोफेसरची भूमिका मिळवण्यासाठी तब्बल पाच वेळा ऑडिशन द्याव्या लागल्या होत्या, असे अल्वारोने सांगितले. तो म्हणाला, ” मी जवळ-जवळ दोन महीने ऑडिशन देत होतो. पहिल्या ऑडिशन नंतर मला वाटलं की ठिके ही एक चोरी आहे आणि स्पेन महणजे ते ‘ओशन एलेवन’च रिमेक असणार, म्हणून त्यांना जॉर्ज क्लूनी हवा असेल..”. मात्र अल्वारो मोर्टेच्या अभिनय कौशल्यामुळे त्याला ही भूमिका मिळाली आणि त्याने ती उत्तम रित्या साकारत असल्याचे दिसून आले. प्रेक्षक प्रोफेसरच्या भूमिकेमध्ये अल्वारो मोर्टे सोडून अजून कोणाला पाहू शकत नाहीत.
दरम्यान ‘मनी हाइस्ट’च्या बहुचर्चित पाचव्या सिझनचे पहिले पाच भाग ३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहेत. हे पहिले पाच भाग प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. तसंच या सिझनचे पुढचे पाच भाग ३ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजता प्रदर्शित होतील.