आपल्या दमदार भाषणांसाठी अनेकांचे आवडते असलेल्या राज यांचा आज १४ जून रोजी ५४ वा वाढदिवस आहे. राज ठाकरेंना चित्रपट, नाटक आणि संगीताची आवड आहे. फक्त राज नाही तर त्यांच्या वडिलांनाही या सगळ्याची आवड होती. पण तुम्हाला माहितीये श्रीकांत ठाकरे यांच्यामुळे मोहम्मद रफी हे भक्तीगीत गाऊ लागले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : २४ वर्षे बेपत्ता असलेल्या अभिनेत्याच्या पत्नीने केलं दुसरं लग्न, मुलगी करते आता हे काम

मोहम्मद रफी यांनी मराठीत पहिल्यांदा १९५५ मध्ये गाणं गायलं होतं. पांडुरंग दीक्षित यांनी संगीत दिलेल्या ’शिर्डीचे साईबाबा’या चित्रपटातील ‘काहे तीरथ जाता रे भाई, शिर्डी जाकर देख साई’. पण या गाण्याला मराठीत म्हणता येणार नाही कारण चित्रपट जरी मराठी असला तरी गाण्याचे बोल हे हिंदी होते. त्यानंतर त्यांनी १९६७ साली प्रदर्शित झालेल्या ’श्रीमंत मेहुणा पाहिजे’ या चित्रपटात पहिल्यांदा ’ही दुनिया बहुरंगी’ हे गीत गायलं आणि हेच त्यांचं पहिलं मराठी चित्रपट गीत ठरलं. त्यानंतर मोहम्मद यांनी १९७५ साली प्रदर्शित झालेल्या श्रीकांत ठाकरे यांच्या ‘शूरा मी वंदिले’ या चित्रपटात गाणी गायली होती. हा चित्रपट इतका काही हिट झाला नाही पण मोहम्मद रफी आणि श्रीकांत ठाकरे यांची चांगली मैत्री झाली आणि इथूनच रफीच्या नॉनफिल्मी मराठी गाण्यांचा एक अध्याय सुरू झाला.

आणखी वाचा : Siddhanth Kapoor Drug Test : ड्रग्स प्रकरणात मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शक्ति कपूर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “मी फक्त…”

आणखी वाचा : प्रेक्षक बोंबा मारायला लागले म्हणून भरत जाधवने थांबवलं नाटक; महापौरांना केला कॉल अन्…

त्यावेळी कवयित्री वंदना विटणकर ह्यांच्या काही कविता गीतरूपाने आल्या होत्या. श्रीकांत आणि वंगना यांच्यात गाण्याबाबत नेहमीच चर्चा सुरु असायच्या. आधी सूर की आधी शब्द असा वाद चालायचा. ’कसले तुम्ही मराठी कवी? नुसते दळूबाई सारखी गाणी लिहिता. तेच तेच शब्द त्याच त्याच रचना… तिकडे हिंदीत बघा. चालीवर गाणी लिहितात म्हणून ती गाणी कशी ताजी वाटतात’, असे श्रीकांत गमतीत त्यांना म्हणाले. त्यानंतर श्रीकांत यांनी मालकंस रागातील एक चाल वंदना यांना ऐकवली आणि म्हणाले ’आता यावर तुम्ही एक भक्ती गीत लिहा. पण मात्र वंदना ताईंनी कधी चालीवर गाणी लिहिली नव्हती. रात्रभर त्या शब्दासाठी तळमळत राहिल्या. झोपेत सुध्दा त्या सुरांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही. अखेर शब्द जुळून आले, गाण्याचा मुखडा तयार झाला. ’शोधीसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी’ हा मुखडा श्रीकांतजींना प्रचंड आवडला आणि त्यांनी वंदना ताईंनी पुढे लिहायला सांगितलं.

आणखी वाचा : कोटींच्या संपत्तीचा मालक असलेला अंकिताचा पती काय काम करतो माहितीये का?

हेच गाणं पुढे मोहम्मद रफी यांनी गायलं. मोहम्मद रफी यांना देवनागरी लिपी येत नव्हती पण श्रीकांत यांना उर्दूचे उत्तम ज्ञान होते. त्यांनी हे गाणं उर्दूत लिहून मोहम्मद रफी यांच्या हाती ठेवलं. मोहम्मद रफी यांचे मराठीतील पहिले भक्ती गीत हे ‘शोधीसी मानवा’ ठरले. ही आठवण स्वत: वंदना विटणकर यांनी त्यांच्या ‘हे गीत जीवनाचे’ या त्यांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत सांगितली आहे. एकंदर श्रीकांत ठाकरेंच्या त्या परिश्रमाने रफी मराठी गाणं गायला लागले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohammed rafi was influenced by raj thackeray first time shrikant thackeray and sung marathi bhaktigeet dcp