Mohan Babu Son Manchu Manoj : ज्येष्ठ तेलुगू अभिनेते मोहन बाबू आणि त्यांचा मुलगा मंचू मनोज यांनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या आहेत. मोहन यांनी मुलगा अभिनेता मनोज मंचू आणि सून मोनिका यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी धमकी दिल्याचं मोहन यांनी म्हटलंय. तसेच त्यांनी पोलिसांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे त्यांच्या मुलानेही त्यांच्याविरोधात तक्रार देऊन आरोप केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहन बाबू यांनी दिली तक्रार

मोहन बाबू यांनी दिलेल्या पोलीस तक्रारीनुसार, मनोज मंचू आणि त्याच्याबरोबर आलेल्या काही लोकांनी रविवारी रंगारेड्डी जिल्ह्यातील जलपल्ली येथील त्यांच्या घरी गोंधळ घातला. “मला माझ्या आणि माझ्या संपत्तीच्या सुरक्षेची काळजी वाटतेय. हे लोक मला त्रास देण्यासाठी मी घरी परतायची वाट पाहत आहेत, अशी माहिती मला मिळाली आहे. ते मला भीती दाखवून माझे राहते घर सोडण्यास भाग पाडत आहेत. या लोकांमुळे मला आणि माझ्या घरातील सदस्यांना भीती वाटत आहे, त्यांच्यामुळे आमच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे,” असं मोहन बाबू यांनी पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.

हेही वाचा – रीना रॉयबरोबर अफेअर असूनही पूनमशी लग्न का केलं? शत्रुघ्न सिन्हा म्हणालेले, “निर्णय घेणं…”

मोहन बाबू यांनी मनोज मंचू, मोनिका आणि त्यांना साथ देणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. “माझ्या सुरक्षिततेसाठी मला संरक्षण पुरवा, जेणेकरून मी न घाबरता माझ्या घरी जाऊ शकेन,” असं मोहन बाबू म्हणाले. मोहन बाबू यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या एका कर्मचाऱ्याने सांगितलं की सोमवारी (९ डिसेंबर रोजी) जवळपास ३० लोक त्यांच्या घरात घुसले, कर्मचाऱ्यांना धमकावलं आणि त्यांना बाहेर हाकललं.

हेही वाचा – ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…

मनोज मंचूने दिली तक्रार

दुसरीकडे, मनोज बाबू यांचा मुलगा मनोज मंचू पोलीस स्टेशनला गेल्याचेही वृत्त समोर आले आहे. वडिलांनी आपल्यावर हल्ला केल्याचा दावा त्याने केला. त्याच्या तक्रारीनुसार, रविवारी (८ डिसेंबर रोजी) १० अज्ञात लोक त्याच्या घरात घुसले होते. त्याला पाहून या अज्ञात लोकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा – ‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्रीने फक्त ‘इतक्या’ महिन्यांत घटवलं १७ किलो वजन; चाहत्यांना सांगितला डाएट अन् वर्कआउट प्लॅन

मनोजने तक्रारीत सांगितलं की त्याचे वडील मोहन बाबू यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि हाणामारी झाली आणि त्यात तो जखमी झाला. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिल्याचे वृत्त नवभारत टाइम्सने दिलं आहे. त्याला, त्याची पत्नी आणि त्यांच्या मुलांना सुरक्षा देण्यासाठी पोलिसांनी आवश्यक पावलं उचलावीत. तसेच बेकायदेशीरपणे त्याच्या घरात घुसलेल्यांची ओळख पटवण्यासाठी या प्रकरणाचा तपास करावा, अशी विनंतीही मनोजने पोलिसांना केली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.