Mohanlal Hospitalised : दाक्षिणात्य इंडस्ट्रीत अनेक सुपरस्टार्स आहेत. त्यापैकी एक म्हणजे मोहनलाल. दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील मोहनलाल हे खूप मोठं नाव आहे. मल्याळम सिनेसृष्टीत अत्यंत अदबीनं मोहनलाल यांचं नाव घेतलं जातं. अनेक सुपरहिट चित्रपट त्यांनी दिले आहेत. या सुपरस्टारला रुग्णालयात दाखल केल्याचं वृत्त समोर आलं आहे. या वृत्तामुळे मोहनलाल यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सर्वजण त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
मोहनलाल ( Mohanlal ) यांना तीव्र ताप आणि श्वास घेण्याच्या समस्येमुळे कोचीमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबाबत इंडस्ट्री ट्रॅकर श्रीधर पिल्लई यांनी एक्सवर पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे. त्यांनी अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या रिपोर्टचा फोटो एक्सवर शेअर केला आहे.
या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, ६४ वर्षीय मोहनलाल ( Mohanlal ) यांना रेस्पीरेटरी इन्फेक्शन झाल्याचा संशय आहे. तीव्र ताप आणि श्वास घेण्याच्या समस्येतून ते हळूहळू बरे होतं आहेत. मोहनलाल यांना १६ ऑगस्टला रुग्णालयात दाखल केलं असून डॉक्टरांनी पाच दिवस आराम करण्याचा सल्ला त्यांना दिला आहे. माहितीनुसार, कामाच्या दगदगीमुळे त्यांच्या प्रकृतीमध्ये गडबड झाल्याचं म्हटलं जातं आहे. श्रीधर पिल्लई यांनी मोहनलाल यांचा रिपोर्ट शेअर करून ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा दिली आहे.
मोहनलाल आता दिग्दर्शन क्षेत्रात ठेवणार पाऊल
मोहनलाल यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ते काही दिवसांपूर्वीच गुजराहून कोचीला परतले. त्यांचा आगामी चित्रपट ‘L2 Empuraan’चं चित्रीकरण ते करत होते. लवकरच ते दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. ‘बैरोज’ या चित्रपटाच्या माध्यमातून मोहनलाल दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवणार आहेत. याच चित्रपटात ते प्रमुख भूमिकेतही झळकणार आहेत. २ ऑक्टोबरला ‘बैरोज’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याआधी मोहनलाल यांचा हा चित्रपट १२ सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र काही कारणास्तव प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.