दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते मोहनलाल यांनी ‘असोसिएशन ऑफ मल्याळम मुव्ही आर्टिस्ट’ म्हणजेच AMMAच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. हेमा समितीचा अहवाल समोर आल्यानंतर AMMA ची कार्यकारिणी समिती देखील बरखास्त करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून असोसिएशनच्या काही सदस्यांवर मल्याळम सिनेविश्वातील कलाकारांकडून लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते. यापूर्वी याप्रकरणी अभिनेते सिद्दीकी यांनी रविवारी AMMA च्या सरचिटणीस पदाचा आणि दिग्दर्शक रंजित यांनी केरळ चलचित्र अकादमीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आता मोहनलाल यांच्यासह अन्य सदस्य आपल्या पदावरून पायउतार झाले आहेत.

चित्रपट संघटनेने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, आता येत्या २ महिन्यांत निवडणुका होणार असून त्यानंतर असोसिएशनसाठी नवीन समिती स्थापन करण्यात येणार आहे. “AMMA समितीच्या काही सदस्यांवर कलाकारांनी केलेल्या आरोपांनंतर नैतिक आधारावर या कार्यकारिणीला बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन महिन्यांत निवडणुकीनंतर नवीन समिती स्थापन केली जाईल,” असे असोसिएशनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

kahaani, kahaani vidya balan, kahaani sujoy ghosh
फक्त आठ कोटी बजेट असलेल्या ‘या’ बॉलीवूड सिनेमाने कमावले १०४ कोटी; पटकावले तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, अमिताभ बच्चन…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Dino Morea left movies now handling business
एका चित्रपटाने मिळवून दिली प्रसिद्धी, पण नंतरचे २० सिनेमे ठरले फ्लॉप; आता ‘हा’ व्यवसाय करतोय बॉलीवूड अभिनेता
Dhananjay Powar wife and mother expressed displeasure accusing of Bigg Boss marathi
Video: धनंजय पोवारच्या पत्नी व आईने ‘बिग बॉस’वर आरोप करत व्यक्त केली नाराजी, म्हणाल्या, “त्याला दाखवतंच नाहीये काय भानगड…”
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
Radikaa Sarathkumar says men secretly record videos of actresses in the nude
“अभिनेत्रींचे नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करतात,” ज्येष्ठ अभिनेत्रीचा मोठा दावा; म्हणाल्या, “माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये…”
Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”

हेही वाचा : Actress Namitha Row: अभिनेत्री, भाजपा नेत्या नमिता यांना मंदिरात प्रवेश करण्यासाठी मागितला हिंदू असल्याचा पुरावा

मोहनलाल यांच्यासह सर्व सदस्यांचा राजीनामा

राजीनामा देणाऱ्यांमध्ये मोहनलाल यांच्यासह AMMAचे उपाध्यक्ष जयन चेरथला आणि जगदीश, सहसचिव बाबूराज, खजिनदार उन्नी मुकुंदन आणि कार्यकारी समिती सदस्य अन्सीबा हसन, सरयू मोहन, विनू मोहन, टिनी टॉम, अनन्या, सुरेश कृष्णा, कलाभवन शाजोन, सूरज वेंजारामूडू, जोमोल, जॉय मॅथ्यू आणि टोव्हिनो थॉमस यांचा समावेश आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर मोहनलाल यांनी मौन बाळगलं होतं. मल्याळम कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते असूनही त्यांनी या प्रकरणी भाष्य केलं नव्हतं, त्यामुळे सोशल मीडियावर देखील चर्चांना उधाण आलं होतं. अखेर अध्यक्ष मोहनलाल आणि त्यांच्या १७ सदस्यीय समितीने नैतिक जबाबदारीचं कारण देत आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे.

हेही वाचा : Video : अधिपतीचा जीव धोक्यात…; चंचला खेळली मोठा डाव; आता काय करणार अक्षरा? पाहा जबरदस्त प्रोमो…

हेही वाचा : “मी खूप कृतज्ञ आहे…”, नव्या मालिकेविषयी सांगताना मृणाल दुसानिसचं वक्तव्य, म्हणाली, “मालिकेचं नाव…”

दरम्यान, मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये महिलांबाबत होत असलेल्या गैरप्रकारांसंदर्भात केरळ सरकारने आता महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबर बैठक बोलावून महिला कलाकारांवरील अत्याचाराच्या चौकशीसाठी सात सदस्यीय विशेष पथक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय आता येत्या दोन महिन्यांत AMMA ची नवीन कार्यकारिणी पदभार स्वीकारणार आहे.