‘नीलकंठ’ या पहिल्या पौराणिक ब्रॉडवे संगीतिकेच्या पहिल्या पोस्टरचे नुकतेच अनावरण झाले. यावेळी नीलकंठची टीम काजल मुगराय, अश्मित दिनो आणि दिग्दर्शक इशान सूद उपस्थित होते. अभिनेता मोहित रैनाच्या हस्ते पोस्टरचे अनावरण करण्यात आले. ‘नीलकंठ’ ही भारतातील प्रथम पौराणिक ब्रॉडवे संगीतिका असून या अद्भुत दृश्यानुभवासाठी अनेक नावाजलेले संगीतकार, गायक आणि इल्युजन कलाकारांसोबत भागीदारी करण्यात आली आहे. नितिन शंकर हे संगीतकार, साहिल सुल्तानपुरी हे गीतकार तर अन्वेषा दत्ता या गायिका या संगीतिकेसोबत संलग्न आहेत.
तंत्रज्ञान आणि कलेचा दिवसेंदिवस विकास होत चालला असून भारतही विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे आणि लोक आपली कलात्मकता दर्शवण्यासाठी विभिन्न पद्धतींवर काम करत आहेत. नीलकंठ हे अशाच एका दिग्दर्शक – इशान सूदचे स्वप्न आहे. आख्यान, संगीत, नाट्य आणि रोचक कथेसह भगवान शंकराचे आयुष्य दर्शवण्यासाठी इशान यांनी खूप मेहनत घेतली आहे. यावेळी मोहीत रैना म्हणाला, ‘ही संकल्पना अतिशय रोचक आहे आणि हा शो पाहण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. माझ्याकडून नीळकंठच्या टीमच्या खूप खूप शुभेच्छा.’