अभिनेत्री उर्मिला मातोंडकर एकेकाळी असंख्य चाहत्यांच्या मनावर राज्य करत होती. उर्मिलाने वयाच्या ४२ व्या वर्षी काश्मिरी व्यापारी आणि मॉडेल मोहसिन अख्तरसोबत लग्न केले. एके दिवशी तिने अचानक लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. तसंच काहीसा धक्का तिने आणि तिचा नवरा मोहसिन अख्तरने पुन्हा एकदा चत्यांना दिला आहे. उर्मिलाच्या नवऱ्याने नुकताच एक वर्षाच्या लहान मुलीबरोबकर आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यातवरून या दोघांनी मुलगी दत्तक घेणल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
हेही वाचा : “गाडी ठाण्यात आली आणि…” क्षितिज दातेने शेअर केली एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारतानाची ‘ती’ खास आठवण
उर्मिला मातोंडकरचा नवरा मोहसिनने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत त्याला कॅप्शनमध्ये त्याने “लिटील प्रिन्सेस,तुझ्या येण्याने आमचं आयुष्य उजळून निघालंय, आज तुझा पहिला वाढदिवस साजरा करताना आनंद होतोय आणि सांगावसं वाटतंय तू हे एक वर्ष फक्त आणि फक्त आमच्या आयुष्यात आनंद निर्माण केलं आहेस. हॅप्पी बर्थडे प्रिय आयरा.”
आणखी वाचा : बॉलिवूडमधील या प्रसिद्ध अभिनेत्रींनी वयाच्या चाळीशीनंतर थाटला संसार, विवाह ठरला होता चर्चेचा विषय
या पोस्टनंतर लोकांनी उर्मिला आणि मोहसिनला नेटकऱ्यांनी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. यासंदर्भात खरं काय ते जाणून घेण्यासाठी उर्मिला-मोहसीनला प्रसारमध्यमांनी संपर्क केला त्यानंतर दोघांनी ही त्यांची पुतणी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ती मोहसिनच्या मोठ्या भावाची मुलगी आहे असं उर्मिला म्हणाली. त्यानंतर मोहसिनेही आपल्या पोस्टमध्ये बदल करत त्यात आयरा ही आपली पुतणी आहे असा स्प्षट उल्लेख केला. पण तोपर्यंत सर्वांना वाटत होतं की उर्मिलाने मुलगी दत्तक घेतली आहे आणि ती आई बनली आहे.