परमेश्वरभक्तीचे अप्रतिम उदाहरण म्हणजे पंढरपूरची वारी. आषाढी, कार्तिकी एकादशीला लाखो भाविक न चुकता धर्म, जात, पंत, लहान-थोर असा सगळा भेदभाव विसरून १८ दिवस पायी चालत जाऊन विठुमाऊली चरणी लीन होतात. या १८ दिवसांच्या वारीच्या प्रवासादरम्यान भगवद्‌गीतेतील १८ अध्याय कशाप्रकारे उलगडले जातात हे ‘मोक्ष’ या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मोक्ष’ ही कथा एका पार्थ नावाच्या चित्रपट दिग्दर्शकाविषयी आहे. मूळात अहंकारी स्वभावाच्या पार्थचा संबंध चित्रपट र्निर्मितीमुळे वारीशी येतो. तेथे गेल्यावर त्याच्या आयुष्यात कशाप्रकारे बदल होतात हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. पार्थ हा एक महत्त्वकांक्षी चित्रपट निर्माता आहे. जो आपल्या प्रेयसीसोबत तिच्याच घरी राहतो. एरिक नावाच्या एका अमेरिकी विद्यार्थ्यासोबत तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट बनवण्याची योजना आखतो. त्यासाठी ते पंढरपुरची वारी निवडतात. १८ दिवसात २४० किमीचे अंतर पायी कापणार्या या वारकर्यांचे जीवनदर्शन, त्यांचे अनुभव आपल्या कॅमेरात कैद करण्याचे ते ठरवतात. वारीत गेल्यावर पार्थला असे काही अनुभव येतात की त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. वारीतील लोकांच्या सहवासामुळे त्याची विचारप्रवृत्ती बदलते. त्याचा अहंकार नाहीसा होतो. हाच लाखमोलाचा संदेश सुनील खोसला आणि विभा खोसला यांच्या ‘मोक्ष’ या चित्रपटातून देण्यात आला आहे. ‘बुटीक सिनेमा’ या बॅनरअंतर्गत निर्मित हा चित्रपट ३ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

चिन्मय मांडलेकर, सुहास शिरसाट, उमेश जगताप, सुखदा यश यांच्यासह एडवर्ड सानेनब्लिक यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते
संगीत दिग्दर्शक शैलेंद्र बर्वे यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.