सध्या रितेश देशमुखच्या आयुष्यात अनेक चांगल्या घडामोडी घडताना दिसत आहे. अलिकडेच भाऊ धीरज देशमुख आणि वहिनी दीपशिखा (हनी भगनानी) ला झालेल्या पुत्ररत्न प्राप्तीमुळे रितेश काका झालाय, लवकरच ‘हमशकल्स’ आणि ‘एक व्हिलन’ हे त्याचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्याशिवाय ‘लय भारी’ चित्रपटाद्वारे तो पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करत आहे आणि आता पत्नी जेनेलिया आणि तो आई-बाबा होण्याच्या वाटेवर आहेत. मातृत्वाच्या वाटेवर असलेली जेनेलिया पती रितेश देशमुखबरोबर रविवारी (८ जून) पार पडलेल्या ‘लय भारी’ चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्याला उपस्थित होती. जेनेलियाची मातृत्वाची चाहूल तिने परिधान केलेल्या अनारकली पोशाखातून डोकावत होती. लवकरच ‘हमशकल्स’ आणि ‘एक व्हिलन’ चित्रपटात दिसणाऱ्या रितेशनेदेखील पत्नीच्या गरोदपणाच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. मोठ्या कालावधीनंतर जेनेलिया पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित होती. जेनेलिया सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहाण्याचे टाळत असल्याने ती गरोदर असल्याचे अंदाज बांधण्यात येत होते. ‘लय भारी’ चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्याला रितेश काळ्या रंगाची ट्राउझर, पांढरा शर्ट आणि नेहरू जॅकेट परिधान करून कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होता.
फोटो गेलेरी पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
‘लय भारी’ : पती रितेश देशमुखबरोबर मातृत्वाच्या वाटेवरील जेनेलिया डिसुझा
सध्या रितेश देशमुखच्या आयुष्यात अनेक चांगल्या घडामोडी घडताना दिसत आहे. अलिकडेच भाऊ धीरज देशमुख आणि वहिनी दीपशिखा (हनी भगनानी) ला झालेल्या पुत्ररत्न प्राप्तीमुळे रितेश काका झालाय, लवकरच 'हमशकल्स' आणि 'एक व्हिलन' हे त्याचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत.
First published on: 09-06-2014 at 02:41 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodमराठी चित्रपटMarathi Movieमराठी फिल्मMarathi Filmमराठी सिनेमाMarathi Cinemaहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 3 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mom to be genelia dsouza steps out with hubby riteish deshmukh