सध्या रितेश देशमुखच्या आयुष्यात अनेक चांगल्या घडामोडी घडताना दिसत आहे. अलिकडेच भाऊ धीरज देशमुख आणि वहिनी दीपशिखा (हनी भगनानी) ला झालेल्या पुत्ररत्न प्राप्तीमुळे रितेश काका झालाय, लवकरच ‘हमशकल्स’ आणि ‘एक व्हिलन’ हे त्याचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्याशिवाय ‘लय भारी’ चित्रपटाद्वारे तो पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करत आहे आणि आता पत्नी जेनेलिया आणि तो आई-बाबा होण्याच्या वाटेवर आहेत. मातृत्वाच्या वाटेवर असलेली जेनेलिया पती रितेश देशमुखबरोबर रविवारी (८ जून) पार पडलेल्या ‘लय भारी’ चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्याला उपस्थित होती. जेनेलियाची मातृत्वाची चाहूल तिने परिधान केलेल्या अनारकली पोशाखातून डोकावत होती. लवकरच ‘हमशकल्स’ आणि ‘एक व्हिलन’ चित्रपटात दिसणाऱ्या रितेशनेदेखील पत्नीच्या गरोदपणाच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. मोठ्या कालावधीनंतर जेनेलिया पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित होती. जेनेलिया सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहाण्याचे टाळत असल्याने ती गरोदर असल्याचे अंदाज बांधण्यात येत होते. ‘लय भारी’ चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्याला रितेश काळ्या रंगाची ट्राउझर, पांढरा शर्ट आणि नेहरू जॅकेट परिधान करून कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होता.
फोटो गेलेरी पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा