अभिनेत्री सोनम कपूर तिच्या फॅशन सेन्ससाठी अधिक प्रसिद्ध आहे. अभिनयाबरोबरच तिची ड्रेसिंग स्टाइल कमालीची आहे. सतत चर्चेत कसं राहता येईल हे या अभिनेत्रीला अचूक ठाऊक आहे. सोनमने आनंद अहुजाशी लग्नगाठ बांधली आणि नव्याने आयुष्याला सुरुवात केली. सुखी संसारात ती रमली असताना काही दिवसांपूर्वी आपण गरोदर असल्याची बातमी तिने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांपर्यंत पोहोचवली. प्रेग्नेंसी एण्जॉय करत असताना तिने खास फोटोशूट देखील केलं. आता तर चक्क ती हॉटेलमध्ये एक पदार्थ बनवताना दिसत आहे.

सोनमने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ लंडनमधील एका हॉटेलमधला आहे. आपला आवडता गोड पदार्थ गोल्डन हेजलनट बनवताना ती या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा गोड पदार्थ कसा तयार करायचा हे ती या हॉटेलच्या शेफकडून शिकत आहे. इतर स्त्रियांप्रमाणेच सोनमला देखील प्रेग्नेंसीदरम्यान वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होत असावी.

सोनमने हॉटेलमधील हा व्हिडीओ शेअर करताच काही तासांमध्येच या व्हिडीओला हजारो लाईक आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. सोनमने काळ्या रंगाचा टॉप परिधान केला असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. सोनम सोशल मीडियाद्वारे देखील तिच्या चाहत्यांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करते. ती गेले काही महिने चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडली गेली आहे.

आणखी वाचा – करिश्माच्या पार्टीत मलायका-करीनाने वेधलं साऱ्यांचं लक्ष, हॉट लूकची होतेय चर्चा

सोनमने काही दिवसांपूर्वीच काळ्या रंगाच्या ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये प्रेग्नेंसी फोटोशूट केलं होतं. तिचे हे फोटो देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो देखील आता स्पष्टपणे दिसून येतो. प्रेग्नेंसीनंतर सोनम एका क्राइम थ्रिलर चित्रपटामध्ये काम करताना दिसेल.

Story img Loader