हॉलिवूड आणि पाश्चिमात्य देशांमध्ये बरेच असे कलाकार आहेत ज्यांना भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माबाबत खूप आस्था आहे. आता प्रसिद्ध स्पॅनिश अभिनेत्री एस्टर असेबोचाही यामध्ये समावेश झाला आहे. एस्टरच्या घरातील काही फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोत एस्टरच्या मागच्या भिंतीवर गणपतीचा फोटो लावलेला दिसत आहे.

एस्टरनं लोकप्रिय वेब सीरिज ‘मनी हाइस्ट’मध्ये ‘स्टॉकहोम’ची भूमिका साकारली होती. सोशल मीडियावर एस्टरचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता देशभरात या फोटोंची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. युजर सोशल मीडियावर आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. एका स्पॅनिश अभिनेत्रीला हिंदू धर्माबाबत असलेली आस्था पाहून अनेकांनी ही अभिमानाची बाब असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय वेब सीरिज ‘मनी हाइस्ट’चा हिंदी रिमेक तयार केला जाणार आहे. याचं नाव ‘थ्री मंकीज’ असं असणार आहे. याच्या हिंदी रिमेकमध्ये अभिनेता अर्जुन रामपाल प्रोफेसरच्या भूमिकेत दिसणार आहे. ओरिजिनल वेब सीरिजमध्ये ही भूमिका अभिनेता अल्वारो मोर्तेने साकारली होती. नोव्हेंबर महिन्यात अर्जुननं या वेब सीरिजच्या शूटिंगला सुरुवात केल्यानंतर काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अब्बास मस्तान या वेब सीरीजचं दिग्दर्शन करणार आहेत.

Story img Loader