नेटफ्लिक्सची ‘मनी हाईस्ट’ ही वेब सीरिज सध्या सर्वत्र चर्चेत आहे. मूळ स्पॅनिश भाषेत असलेल्या या सीरिजने आपल्या अनोख्या पटकथेच्या जोरावर संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. स्वत:कडे गमावण्यासारखं काहीच नसलेला एक प्रोफेसर विविध क्षेत्रातील आठ लोकांना एकत्र आणून चोरीचा मोठा प्लॅन आखतो. या लक्षवेधी चोरीने तब्बल चार सिझन प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. आता या सीरिजचा पाचवा आणि अंतीम भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
अवश्य पाहा – ‘मोबाईल रिंगटोनची निवड योग्य करा, अन्यथा…’; बिग बींनी शेअर केलेला व्हिडीओ पाहाच…
मनी हाईस्टमध्ये ‘प्रोफेसर’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अल्वारो मोर्ते याने एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून या पाचव्या सीझनची घोषची केली. या सीरिजचं पाचवं पर्व येत्या पाच मे २०२१ पासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘मी परत आलोय. प्रोफेसर परत आलाय’, असं कॅप्शन देत अल्वारोने एक फोटो पोस्ट केला आहे. ‘मनी हाइस्ट’चा चौथा सिझन अत्यंत निर्णायक वळणावर येऊन संपला होता. त्यामुळे पाचव्या सिझनची प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. लॉकडाउनच्या काळात हा चौथा सिझन प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
ही सीरिज नेटफ्लिक्सच्या टॉप ट्रेण्डिंग सीरिजमध्ये आली होती. भारतातही या सीरिजचे प्रचंड चाहते आहेत. प्रोफेसरची भूमिका साकारणारा अभिनेता अल्वारो मोर्ते याच्याविषयी तरुणींमध्ये फार क्रेझ आहे.