अभिनेत्री आणि म्यूजिशियन मोनिका डोगराने काही दिवसांपूर्वीच Pansexual असल्याचा खुलासा केला होता. एवढंच नाही तर, ३९ वर्षांच्या मोनिकाने तिच्या लग्नाची बातमीही लपवूनही ठेवली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मोनिकाने या विषयी सांगितले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : व्हिडीओ मलायकाचा, पण मागच्या काकांनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष; पाहा व्हिडीओ

मोनिकाने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला नुकतीच मुलाखत दिली होती. या मुलाखतीत ती Pansexual आहे हे कळल्यानंतर तिला काय वाटले याविषयी सांगितले. “मला मी Pansexual आहे हे कळण्याआधी, पाच-सहा वर्षापूर्वीच मी हा शब्द ऐकला होता आणि तेव्हा लगेच मला वाटलं की मी सुद्धा त्यापैकी एक असू शकते. एकतर तुम्ही समलैंगिक असता किंवा नसता. जर मी समलैंगिक आहे किंवा गे आहे असं सांगितलं असतं तर कुणीच माझा स्विकार केला नसता. ‘गे’ हा शब्द असा होता ज्याच्याविषयी समाजात फार काही चांगलं बोललं जात नाही.”

आणखी वाचा : “झाडाला मिठी मारण्यापेक्षा…”, पुन्हा एकदा सुमीत राघवनचे ट्वीट चर्चेत

मोनिका पुढे म्हणाली, “शाळेत असताना मी अगदी टॉमबॉय सारखे वागायचे आणि जसजशी मी मोठी होत गेले तेव्हा मी स्त्रीत्वाचा देखील आनंद घेतला. मला दोन्ही लिंगांच्या व्यक्तींसमोर स्वतःला एक्सप्रेस करायला, त्यांना माझ्याकडे आकर्षित करून घ्यायला आवडायचं. मी कॉलेजमध्ये असेपर्यंत कधीही मुलीला किस केले नाही किंवा मुलीसोबत लैंगिक संबंध ठेवले नाही.”

आणखी वाचा : अर्जुन कपूरची बहिण अंशुलाने कॅमेऱ्यासमोर काढून दाखवली ब्रा; प्रियांका चोप्रा, म्हणाली…

पुढे मोनिका म्हणाली, “पण नंतर अचानक माझ्यात बदल होऊ लागले, मी नक्की कोण आहे याविषयी मनातला संभ्रम वाढत गेला. मग मला वाटलं कदाचित मी bisexual आहे, मला पुरुष आणि स्त्रीया दोन्ही आवडतात आणि तोपर्यंत मला खरंच माहित नव्हतं की Pansexual म्हणजे नक्की काय आहे. मला ५ ते ६ वर्षांपूर्वी एवढं कळालं की मला feminine energy असलेले पुरुष आणि masculine energy असलेल्या स्त्रिया आवडतात. Pansexuality बद्दल अनेकांना माहित नाही. हे माझ्यासाठी सर्वात योग्य आहे असं मला वाटते, मला जे सुंदर दिसतं त्याचं मला आश्चर्य वाटतं.”

आणखी वाचा : टायगर श्रॉफच्या आजोबांचा दुसऱ्या महायुद्धात होता सहभाग!

पुढे लग्नाविषयी बोलताना मोनिका म्हणाली, “मी अशा पुरुषाशी लग्न केलं होतं जो खुप समजूतदार, हुशार, प्रेमळ आणि चांगला माणूस आहे. मी जेव्हा त्याला सांगितलं की माझ्या चित्रपटात ट्रान्स वूमनची भूमिका साकारणारी महिला मला आवडते. त्यावेळी त्याने मला झिडकारलं नाही उलट अधिक प्रेम दिलं. आता आम्ही विभक्त झालो आहोत. आम्ही खूप विचार करुन विभक्त होण्याचा निर्णय घेतला. हेच एक कारण होतं की माझं लग्न मी नेहमी मीडियापासून लपवून ठेवलं.”

आणखी वाचा : 50 Shades Of Gray: “मला बेडवर फेकले अन्…”, इंटिमेट सीन शूटचा डकोटाने सांगितला ‘तो’ धक्कादायक अनुभव

पुढे मोनिका म्हणाली, “मी अनेक वर्षांपासून माझ्या सेक्शु्अ‍ॅलिटीविषयी खरंच बोलत आले, पण तेव्हा लोकांच्या लक्षात आलं नव्हतं. काही दिवसानंतर माझी ‘द मॅरिड वूमन’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली. यामध्ये एक बॉयफ्रेंड असताना देखील एका लग्न झालेल्या मुलीच्या प्रेमात मी पडते असं दाखवण्यात आलं.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monica dogra opens up on being pan sexual reveals she was married to a wise kind and understanding man dcp