दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा बहुप्रतिक्षित ‘आदिपुरुष’ चित्रपट अखेरीस आज प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचं पोस्टर, ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. आता ‘आदिपुरुष’ पाहण्यासाठी सिनेरसिक चित्रपटगृहांबाहेर तुफान गर्दी करत आहेत. सोशल मीडियाद्वारे अनेक जण चित्रपटाचं तोंडभरुन कौतुकही करत आहेत. इतकंच नव्हे तर या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. आता या चित्रपटाबाबतच एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.

‘आदिपुरुष’ने आगाऊ बुकिंगमध्येच कोट्यवधी रुपयांचा आकडा गाठला. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी केली आहे. अशामध्येच एका चित्रपटगृहामध्ये ‘आदिपुरुष’चा शो सुरु असताना एक वेगळीच घटना घडली. चित्रपट सुरु असताना चित्रपटगृहात चक्क माकडाने एन्ट्री केली.

Muramba
Video: रमाच्या आईला ओळखण्यात माही चूक करणार अन्…; अक्षय सत्य शोधून काढणार? ‘मुरांबा’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
video shows Monkey And Man ate from one plate
VIDEO : विश्वासच बसेना! जेवताना ताटापुढे येऊन बसले माकड अन्… पुढे जे घडले, ते पाहून तुम्हीही कराल कौतुक
The woman watered to the monkey
‘आई तू खरंच देवासारखी आहेस…’ तहानलेल्या माकडाला मिळाली आईची माया… VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “आई ती आईच”
Muramba
Video: “ही रमाच आहे की…”, माहीच्या ‘त्या’ कृतीमुळे अक्षयला येणार संशय; ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट
woman fed a thirsty monkey water
आधी बॅगेवर, मग बाकावर! पाण्याच्या थेंबासाठी सैरभैर झालेल्या माकडाला ‘तिने’ ओळखले; VIDEO पाहून म्हणाल माणुसकी आहे जिवंत
udayanraje Bhosle called chhava director laxman utekar
‘छावा’तील ‘ती’ दृश्ये बदलणार? उदयनराजेंनी थेट फोन केल्यावर दिग्दर्शक म्हणाले, “चित्रपटामध्ये फक्त आपले राजे…”
Eagle vs crab thrilling fight shocking video went viral on social media
“वेळ प्रत्येकाची येते विश्वास ठेवा” चिमुकल्या खेकड्यानं भल्यामोठ्या गरुडाला अक्षरश: हतबल केलं; लढतीचा VIDEO पाहून थक्क व्हाल

आणखी वाचा – “दर्गा व चर्चमध्ये जातो आणि…” सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट पाहून नेटकऱ्यांचा संताप, अभिनेता म्हणतो, “भावा नीट वाच कारण…”

माकड चित्रपटगृहाच्या भिंतीच्या वरच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेतून आतमध्ये आलं. चित्रपट पाहत असलेल्या प्रेक्षकांचं त्या माकडाकडे लक्ष गेलं. त्यानंतर चित्रपटगृहात एकच गोंधळ उडाला. प्रेक्षकांनी शिट्या व टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हे तर जय हनुमान म्हणून घोषणा देण्यासही सुरुवात झाली.

आणखी वाचा – लेह-लडाखला पोहोचले समीर चौघुले, फोटो पाहून प्राजक्ता माळीची कमेंट, म्हणाली, “दादा…”

‘आदिपुरुष’ सुरु असताना माकडाची एन्ट्री आणि त्यादरम्यानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नडमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात प्रभास भगवान राम, क्रिती सेनॉन सीता आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहेत. तसेच देवदत्त नागे, तेजस्विनी पंडित या मराठमोळ्या कलाकारांची चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Story img Loader