कित्येक प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट बघत होते त्या पोन्नियिन सेलवन म्हणजेच ‘पीएस १’ चा ट्रेलर कालच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट म्हणजे दिग्दर्शक मणीरत्नम यांचा सर्वात महत्वाकांक्षी चित्रपट आहे. जेव्हा या चित्रपटाचा फर्स्ट लूक आला तेव्हापासून याबद्दल लोकांमध्ये कुतूहल निर्माण व्हायला सुरू झालं होतं. काल प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने ती उत्सुकता आणखीन वाढवली आहे. हा ट्रेलर ५ वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे आणि प्रेक्षकांनी याला उदंड प्रतिसाद दिला आहे.

चित्रपटाची कथा कल्की कृष्णमूर्तिच्या कादंबरीवर आधारित १० व्या शतकातल्या चोळ साम्राज्याच्या इतिहासावर बेतलेली असणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरून अंदाज येत आहे की फार मेहनत घेऊन हा गौरवशाली इतिहास लोकांपुढे आणायचा प्रयत्न केला गेला आहे. ट्रेलरमधून चित्रपटातल्या मुख्य पात्रांची ओळखसुद्धा करून देण्यात आली आहे.

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
young girl fight with ola auto viral video
“ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
Kanguva Box office collection Day 1
Kanguva: ३५० कोटींचे बजेट असलेल्या ‘कंगुवा’ची निराशाजनक सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त…
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
pinaka rocket system france
भारताच्या ‘पिनाका’ रॉकेट लाँचर्सची मागणी जगभरात; कारण काय? काय आहेत याची वैशिष्ट्ये?
2024 Maruti Suzuki Dzire Launch Live Updates: Prices start at Rs 6.79 lakh, to rival Honda Amaze
५ स्टार सेफ्टी रेटिंग, जबरदस्त मायलेज आणि आकर्षक लूकसह नवीन मारुती जनरेशन Dzire 2024 लाँच; पाहा किंमत

चियान विक्रम आदित्य करिकालनच्या भूमिकेत दिसणार आहे. तर जयम रवि हा अरुलमोळी वर्मनच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे, कार्थीसुद्धा एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे, याबरोबरच राजकुमारी कुंदवईची भूमिका त्रीशा कृष्णन साकारत असून, राणी नंदिनीच्या भूमिकेत ऐश्वर्या राय बच्चन दिसणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवरून असा अंदाज लावता येईल प्रेमकहाणी आणि सिंहासनासाठीचा संघर्ष अशा २ भागात या चित्रपटाची कथा आपल्यासमोर उलगडेल. चित्रपटाचं संगीत ए आर रहमान यांनी दिलं आहे.

चेन्नईमध्ये हा ट्रेलर भव्य पद्धतीने प्रदर्शित केला गेला. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतल्या बऱ्याच लोकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. चित्रपटाच्या कलाकारांबरोबर दिग्दर्शक मणीरत्नमसुद्धा हजर होते. याबरोबरच सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसनसुद्धा कार्यक्रमाला आले होते. वेगवेगळ्या भाषेतल्या ट्रेलरसाठी बऱ्याच कलाकारांनी त्यांचा आवाज दिला आहे. यात कमल हासन, अनिल कपूर, पृथ्वीराज सुकुमारन, राणा दग्गूबाती यांचा समावेश आहे.

आणखी वाचा : करण जोहरने दिलेली ५ कोटीची देणगी भारतीय सैन्याने नाकारली होती; किस्सा होतोय पुन्हा व्हायरल

हा चित्रपट दोन भागात येणार असून याच्या पहिल्या भागाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटासाठी तब्बल ५०० कोटी इतका खर्च आल्याचं म्हंटलं जात आहे. शिवाय आयमॅक्स थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला तामीळ चित्रपट असल्याचंही म्हंटलं जात आहे. हा चित्रपट ३० सप्टेंबर २०२२ या दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.