तब्बल २१ वर्षाने भारताने ‘मिस युनिव्हर्स २०२१’चा खिताब जिंकला. भारताची सौंदर्यवती हरनाझ संधू ‘मिस युनिव्हर्स २०२१’ या मुकुटाची मानकरी ठरली. यंदाची ‘मिस युनिव्हर्स’ ही स्पर्धा इस्त्रायलमध्ये पार पडली. तिच्याआधी सुश्मिता सेन आणि लारा दत्ता यांनी अनुक्रमे १९९४ आणि २००० मध्ये ‘मिस युनिव्हर्स’चा खिताब जिंकला होता. त्यानतंर तब्बल २१ वर्षाने भारताला ‘मिस युनिव्हर्स’चा खिताब मिळाला. दरम्यान हरनाझ संधूने मिस युनिव्हर्सचा खिताब मिळवल्यानंतर गुगलवर तिच्याबद्दल अनेक गोष्टी सर्च करण्यात आल्या. यातील सर्वाधिक सर्च केलेला प्रश्न कोणता? याबाबतही गुगलने स्पष्ट केले आहे.

गुगल ट्रेंड लिस्टमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, नेटकऱ्यांनी केवळ हरनाझ संधूबद्दलच नाही तर २०२० मधील विजेती, ऐश्वर्या राय बच्चन, लारा दत्ता, प्रियांका चोप्रा, सुष्मिता सेन या सारख्या भारताच्या माजी सौंदर्य स्पर्धा विजेत्यांबद्दल ही सर्च केले आहे. यासोबतच मिस युनिव्हर्स स्पर्धा नेमकी काय असते, याचेही उत्तर जाणून घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आहे. तसेच हरनाझच्या ज्यावेळी मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकली त्यावेळीच्या क्षणाचे फोटोही तिने शोधले आहेत.

हरनाझ संधू मिस युनिव्हर्स झाल्यानंतर तिच्याबद्दल बऱ्याच गोष्टी शोधल्या गेल्या आहेत. पण त्यासोबतच तिच्याबद्दल गुगलवर सर्वाधिक सर्च केलेला प्रश्न कोणता होता हे देखील समोर आले आहे. गुगल ट्रेंडनुसार, हरनाझ संधूने मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकल्यानंतर तिची उंची नेमकी किती हे जाणून घेण्यासाठी लोकांनी सर्वाधिक उत्सुकता दाखवली.

“माझ्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्री…”, वर्षाच्या शेवटी शाहरुख खानचा करिअरबाबत मोठा खुलासा

यंदाच्या मिस युनिव्हर्स विजेत्याची उंची नेमकी किती? हा प्रश्न नेटकऱ्यांनी गुगलवर सर्वाधिक सर्च केला. त्यामुळे हरनाझ संधूची हाईट नेमकी किती? हा प्रश्न गुगल ट्रेडमध्ये सर्वोच्च स्थानी होता. यावेळी तिची उंची किती मीटर आणि किती फूट आहे असे दोन प्रश्न विचारण्यात आले आहे. यात हरनाझ संधूची उंची १.७६ मीटर इतकी असल्याचे समोर आले आहे. तर फूटमध्ये तिची उंची ही ५ फूट ९ इंच असल्याचे बोललं जात आहे. दरम्यान लारा दत्ताची उंची ही ५ फूट ८ इंच आहे.